कृषी साहाय्यकास निलंबित करण्याचा आदेश
By Admin | Updated: December 6, 2015 02:15 IST2015-12-06T02:15:35+5:302015-12-06T02:15:35+5:30
अंदुरा येथील हरभरा बियाणे वाटपातील अफरातफर प्रकरण.

कृषी साहाय्यकास निलंबित करण्याचा आदेश
अकोला : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंदुरा येथील हरभरा बियाणे वाटपातील अफरातफरप्रकरणी कृषी साहाय्यक संजय पातोंड यांना कारणे दाखवा नोटिस बजावून, निलंबित करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी शनिवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्यांना दिला. यासंदर्भात शेतकर्यांच्या वतीने अँड.प्रवीण कडाळे यांनी शनिवारी न्यायालयात तक्रारदेखील दाखल केली आहे. बियाणे वाटपातील अफरातफरसंदर्भात कारवाईच्या मागणीसाठी गावातील अन्यायग्रस्त शेतकर्यांनी अंदुरा ग्रामपंचायतसमोर आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते.