रेल्वे मालधक्का हलविण्याचा अादेश रद्द
By Admin | Updated: March 30, 2017 20:30 IST2017-03-30T20:30:10+5:302017-03-30T20:30:10+5:30
शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील मालधक्का इतरत्र हलविण्याचा जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिलेला अादेश रद्द करण्यात अाला.

रेल्वे मालधक्का हलविण्याचा अादेश रद्द
माथाडी आणि जनरल कामगार संघटनेच्या मागणीला यश
अकोला, ता. ३० ः शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील मालधक्का इतरत्र हलविण्याचा जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिलेला आदेश महाराष्ट्र राज्य विकास माथाडी आणि कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर रद्द करण्यात आला. कामगारांच्या न्यायीक मागणीसाठी माथाडी आणि कामगार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष साधना गावंडे यांनी सातत्याने पाठपुरावा करून कामगारांची बाजु प्रशासनाकडून रेटून धरल्याने जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी गुरूवार (ता.३०) काही अटींचे पालन करण्याचे निर्देश देत मालधक्का इतरत्र हलविण्याचा निर्णय रद्द केला.
अकोला शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात नागरिकांची,विद्यार्थ्यांची वर्दळ पाहता तसेच त्या ठिकाणी मालधक्का असल्यामुळे जड वाहनांचे होणाऱ्या वर्दळीमुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता विचारात घेता सदर मालधक्का इतरत्र हलविण्याचे आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी ५ जानेवारी २०१७ रोजी रेल्वे प्रशासनाला दिले होते. हा मालधक्का इतरत्र हलविल्यास हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ येणार असल्याने त्यांच्या कुटूंबाच्या पालन-पोषणाचा गंभीर प्रश्न निर्माण होणार असल्याने महाराष्ट्र राज्य विकास माथाडी आणि जनरल कामगार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष साधना गावंडे यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन मालधक्का इतरत्र हलवू नये, अशी मागणी रेटून धरली होती. या प्रश्नावर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलिस विभाग, उप प्रादेशिकक परिवहन अधिककारी, रेल्वे प्रशासन आणि महाराष्ट्र राज्य विकास माथाडी आणि कामगार संघटनेचे अध्यक्ष राजेश सोनकर, प्रल्हाद चोंडणेकर, उपाध्यक्ष विनोद दळवी, सरचिटणीस महेश तावडे, जिल्हाध्यक्ष साधना गावंडे, पराग कांबळे, आदित्य गावंडे, उपेंद्र शर्मा, राहुल मोहोड, सय्यद ताजुद्दीन सय्यद जमीरूद्दीन, राजु किसन इंगळे, शेख अस्लम शेख नादीर, इरफान मेहबुब मुन्नीवाले, शेख जमील बिकारी नांदीवाले, जमीलभाई, कालु पहेलवान, रोशन मोहल्ला बेरेवाले आदी पदाधिकारी, माथाडी कामगारांची सभा घेण्यात आली. या सभेत मालधकक्कका रात्री नऊ ते सकाळी सात या कालावधितच जड माल वाहतूक वाहनांना प्रवेश अनुज्ञेय करण्यात आला. तसेच सकाळी सात ते रात्री नऊ या कालावधीत रेल्वे मालधक्का परिसरात जड माल वाहतूक वाहनांना प्रवेश राहणार नाही. तसेच या बाबतचे मोठ्या आकाराचे सुचना फलक तयार करून लावण्याची जबाबदारी माथाडी आणि जनरल कामगार संघटना व रेल्वे मालधक्क्यावरील सर्व माथाडी, ट्रासपोर्टस व इतर जनरल कामगारांवर देण्यात आली. तसेच जड वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा येणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. कामगारांच्या या ज्वलंत प्रश्नावर माथाडी कामगार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष साधना गावंडे व सर्व पदाधिकारी, कामगारांनी सातत्यपूर्ण दिलेल्या लढ्याला यश आले असल्याने कामगार वर्गात आनंद व्यक्त होत आहे.