संत्रा बाग व्यवस्थापन; ३५ गावांतील शेतकऱ्यांशी ‘कॉन्फरन्सिंग’द्वारे संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 18:08 IST2020-05-03T18:08:40+5:302020-05-03T18:08:57+5:30
शेतकऱ्यांना ‘कॉन्फरन्सिंग’द्वारे संवाद साधून मार्गदर्शन व सल्ला देण्यात येत आहे.

संत्रा बाग व्यवस्थापन; ३५ गावांतील शेतकऱ्यांशी ‘कॉन्फरन्सिंग’द्वारे संवाद
अकोला: विदर्भात संत्रा हे मुख्य फळ पीक आहे. रोगराई टाळण्यासाठी या पिकाची उन्हाळ्यात काळजी घेणे महत्त्वाचे असल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृ षी विद्यापीठ आणि रिलायन्स फाउंडेशनच्यावतीने शेतकऱ्यांना ‘कॉन्फरन्सिंग’द्वारे संवाद साधून मार्गदर्शन व सल्ला देण्यात येत आहे. शनिवारी ३४ गावांतील शेतकऱ्यांना संत्रा पिकांची काळजी घेण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
सध्या संत्राच्या आंबिया बहारातील फळांची गळ, पाण्याचा ताण, कीड व रोग व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, आंतरमशागत या विषयावर डॉ. पंजाबराव देशमुख कृ षी विद्यापीठ अकोला येथील अखिल भारतीय समन्वित फळ संशोधन केंद्र, प्रभारी डॉ. दिनेश पैठणकर तसेच सहायक प्राध्यापक वनस्पतीरोगशास्त्र डॉ. योगेश इंगळे यांनी रिलायन्स फाउंडेशनद्वारा आयोजित आडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संत्रा उत्पादक शेतकºयांशी संवाद साधला.
आंबिया बहाराची फळे उन्हाळ्यात झाडावर पोसली जातात. त्यामुळे पाण्याचा साठा उन्हाळ्यात उपलब्ध असणे जरुरीचे आहे. जमिनीतील ओलावा कमी झाल्यास फळगळ होते व फळांची प्रत खालावते. म्हणून आंबे बहार घेताना ओलिताकडे कटाक्षाने लक्ष देणे जरुरीचे असल्याचे त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कृ षीसह संचालक अनिल खर्चान यांनी शेतकºयांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये शेतकºयांनी आपल्या घरातच बसून फोनद्वारे प्रश्न विचारले.
या ‘कॉन्फरन्स’मध्ये ३५ गावांमधील ४४ शेतकºयांनी सहभाग नोंदविला. ज्यामधे विजय तट्टे, राजकुमार ईश्वरकर व अंकुश कोरडे यांचा समावेश होता. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन विलास सवाणे, जिल्हा व्यवस्थापक रिलायन्स फाउंडेशन तसेच कार्यक्रम सहायक सुमित काळे यांनी केले.