शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

पोस्ट ऑफीसचे पार्सल फोडून त्यात टाकले आक्षेपार्ह साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 00:58 IST

अकोला : अकोल्यातून राजस्थान राज्यातील पिलानी येथे  पाठविलेले पार्सल फोडून त्यात आक्षेपार्ह साहित्य टाकून एकास मानसिक त्रास देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी अकोला पोस्ट विभागाने चौकशी करून दोषीवर कारवाई करावी आणि दहा हजार रुपये नुकसान भरपाईपोटी द्यावे, असा दावा अकोल्यातील ग्राहकाने केला आहे.

ठळक मुद्देपोस्ट विभागावर दहा हजारांचा नुकसान भरपाईचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोल्यातून राजस्थान राज्यातील पिलानी येथे  पाठविलेले पार्सल फोडून त्यात आक्षेपार्ह साहित्य टाकून एकास मानसिक त्रास देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी अकोला पोस्ट विभागाने चौकशी करून दोषीवर कारवाई करावी आणि दहा हजार रुपये नुकसान भरपाईपोटी द्यावे, असा दावा अकोल्यातील ग्राहकाने केला आहे.अकोल्यातील लक्ष्मी नगरात राहणारे अविनाश वर्‍हाडपांडे यांचा मुलगा विक्रम हा राजस्थान येथील पिलानी येथे शिक्षण घेत आहे. घरी केलेले खाद्यपदार्थ मुलाला पाठविण्यासाठी त्यांनी पार्सल तयार केले. २४ मार्च रोजी हेड पोस्ट ऑफीसच्या रजिस्टर पोस्टाने या परिवाराने ते पार्सल पिलानी येथील पत्त्यावर पाठविले. सदर पार्सल विक्रमला २ एप्रिल रोजी मिळाले. प्रथमदर्शनी पार्सल नीटनेटके दिसत असल्याने होस्टेलमध्ये राहत असलेल्या विक्रमने ते पार्सल रूममध्ये ओपन केले. तेव्हा मात्र विक्रमला पार्सल फोडलेले आढळले. सोबतच या पार्सलमध्ये काही आक्षेपार्ह साहित्यही आढळले. हिरव्या रंगाची माळ आणि दोन छोट्या आकाराचे ताम्रपत्र आढळले. सोबतच पूजेचा विधी लिहलेले पेपर होते. या प्रकाराने विक्र म हादरला, त्याने लगेच ही माहिती अकोल्यातील परिवारास कळविली. त्यानंतर विक्रमने पिलानी येथील पोस्ट विभागात, तर त्याचे वडील अविनाश वर्‍हाडपांडे यांनी अकोला पोस्ट विभागात लेखी तक्रार नोंदविली. ७ एप्रिल रोजी जेव्हा अविनाश वर्‍हाडपांडे यांनी पोस्ट विभागात धाव घेतली, तेव्हा त्यांना समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही. त्यामुळे आता झालेल्या प्रकाराबाबत वर्‍हाडपांडे यांनी अकोला पोस्ट विभागावर दहा हजार रुपये नुकसान भरपाईचा दावा केला आहे. आता या दाव्याची दखल पोस्ट विभाग कशी घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

अकोला पोस्ट कार्यालयातच पार्सल फुटल्याचा संशयअकोला हेड ऑफीसच्या पोस्ट कार्यालयातच पार्सल फुटल्याचा संशय वर्‍हाडपांडे यांनी व्यक्त केला आहे. कारण पदार्थ ठेवलेल्या बॉक्सला छिद्र आढळून आले आहे. आतील पदार्थ काढून त्यात आक्षेपार्ह साहित्य टाकून ते जसेच्या तसे पॅकिंग करण्यात आले. ही कसब केवळ पोस्टाचीच असू शकते, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :Akolaअकोला