‘नवप्रकाश’ योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 19:34 IST2017-08-24T19:34:29+5:302017-08-24T19:34:36+5:30
अकोला : कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या कृषी ग्राहकांसह सर्व उच्च व लघुदाब वीज ग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी महावितरणने आणलेल्या नवप्रकाश योजनेचा लाभ घेण्यासाठी थकबाकीदार ग्राहकांना ३१ ऑगस्टपर्यंत संधी आहे.

‘नवप्रकाश’ योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत संधी
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या कृषी ग्राहकांसह सर्व उच्च व लघुदाब वीज ग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी महावितरणने आणलेल्या नवप्रकाश योजनेचा लाभ घेण्यासाठी थकबाकीदार ग्राहकांना ३१ ऑगस्टपर्यंत संधी आहे.
थकबाकीदारांसाठी असलेल्या नवप्रकाश योजनेला गत जून महिन्यात तीन महिन्यांची मुदतवाढ देऊन अंतिम तारीख ३१ ऑगस्ट करण्यात आली आहे. या योजनेत सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना वगळता इतर ग्राहकांनी जून २0१७ ते ३१ ऑगस्ट २0१७ या कालावधीत थकबाकीची मूळ रक्कम भरल्यास ८५ टक्के व्याज व विलंब आकाराची १00 टक्के रक्कम माफ होणार आहे.
नवप्रकाश योजनेत थकबाकीची मूळ रक्कम भरणार्या ग्राहकांना सुरक्षा ठेव, सर्व्हिस कनेक्शन चार्जेस, रिकनेक्शन चार्जेस यामध्ये पूर्णपणे सूट देण्यात आली असून, ग्राहकांना कोणत्याही प्रतिज्ञापत्राची गरज लागणार नाही. शिवाय, वीज जोडणीचा अर्ज ग्राहकांना कार्यालयात मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
संकेतस्थळावर माहिती उपलब्ध
योजनेत सहभागी होणार्या ग्राहकांसाठी महावितरणच्या संकेतस्थळावर संबंधित ग्राहकाला थकीत देयकाची किती रक्कम भरावयाची आहे, याची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. जेथे इंटरनेटची सुविधा नसेल, अशा ग्राहकांना त्यांच्या थकबाकीच्या रकमेचा तपशील महावितरणच्या शाखा कार्यालयापासून ते मंडल कार्यालयात तातडीने उपलब्ध करून देण्यात येत आहे. कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या वीज ग्राहकांनी या नवप्रकाश योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.