शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

इन्स्पायर अवार्डसाठी विद्यार्थ्यांना नोंदणीची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 14:47 IST

इन्स्पायर अवार्डसाठी विद्यार्थ्यांना नोंदणीची संधी आहे. विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी. असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे २00९ पासून इन्स्पायर पुरस्कार योजना सुरू केली.जिल्हास्तरीय प्रदर्शनातून १0 हजार नवचारांना निवडणून राज्यस्तरीय प्रदर्शनात पाठविण्यात येईल. नोव्हेंबरमध्ये जिल्हास्तरीय प्रदर्शन आणि डिसेंबरमध्ये राष्ट्रीय प्रदर्शन होईल.

अकोला: शालेय विद्यार्थ्यांमध्ये सृजनशील आणि रचनात्मक विचार रूजविण्यासाठी केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे २00९ पासून इन्स्पायर पुरस्कार योजना सुरू केली. २0१६ व १७ पासून इन्स्पायर अवार्डस मानक म्हणून घोषीत करण्यात आले. या इन्स्पायर अवार्डसाठी विद्यार्थ्यांना नोंदणीची संधी आहे. विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी. असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.इयत्ता सहावी ते दहावीतील गुणवंत विद्यार्थी या अवार्डमध्ये सहभागी होऊ शकतात. एका शाळेमधून २ ते ३ विद्यार्थ्यांचे सर्वोत्तम विचार निवडून केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर केली जाईल. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापकांद्वारा सर्व शाळेतील मुलांना एकत्र नवविचाराने बदल करण्यासाठी प्रोत्साहित करतील. स्थानिक तांत्रिक समस्या सोडविण्याची एक पद्धत जी एखादा विद्यार्थी रोज त्यांच्या आजुबाजुला घडत असलेल्या कल्पनांचा विचार करतात. ते विचार एका कागदावर त्यांची नोंद करून ते मुख्याध्यापक किंवा शिक्षकाजवळ जमा करावी. जमा केलेल्या कल्पनांचे शालेय स्तरावर परिक्षण केल्यानंतर सर्वोत्तम दोन ते तीन कल्पनांना इन्स्पायर मानक पुरस्कारासाठी अर्जांचे आॅनलाईन नामांकन डीएसटी केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर केले जाईल. नवीन विद्यालय संकेतस्थळावर नोंदणी करू शकतात. विचरांची निवड त्याची नवीनता आणि नवचाराकरीता विद्यार्थ्यांद्वारा दिलेल्या माहितीच्या आधारावर केली जाईल. देशातून एक लाख नवविचार निवडले जातील. सर्व विद्यार्थ्यांना १0 हजार रूपयांचे पुरस्कार डीबीटी अंतर्गत सरळ विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये मिा करण्यात येईल. जिल्हास्तरीय प्रदर्शनातून १0 हजार नवचारांना निवडणून राज्यस्तरीय प्रदर्शनात पाठविण्यात येईल. यातून एक हजार विद्यार्थी निवडले जातील. निवडलेल्या एक हजार प्रतिकृतींना राष्ट्रीयस्तरावरील प्रदर्शनीत ठेवले जाईल. येथे ६0 सर्वोत्तम प्रतिकृती निवडल्या जातील. या प्रतिकृतींना राष्ट्रपती भवना आयोजित उत्सवामध्ये स्थान दिले जाईल. अर्ज ३१ जुलैपर्यंत स्विकारले जाती. आॅक्टोबरमध्ये नामांकन आणि निधीचे वितरण होईल. नोव्हेंबरमध्ये जिल्हास्तरीय प्रदर्शन आणि डिसेंबरमध्ये राष्ट्रीय प्रदर्शन होईल. विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर नोंदणी करावी. असे शिक्षणाधिकारी प्रकाश मुकूंद, उपशिक्षणाधिकारी दिनेश तरोळे, विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र भास्कर, शब्बीर हुसैन यांनी कळविले. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाStudentविद्यार्थीEducationशिक्षण