ऑपरेशन थिएटर बंद
By Admin | Updated: December 6, 2014 00:54 IST2014-12-06T00:54:48+5:302014-12-06T00:54:48+5:30
ऑपरेशन थिएटरच्या दुरुस्तीचे काम मागील सहा महिन्यांपासून सुरू; अनेक रुग्णांच्या शस्त्रक्रिया लांबणीवर.

ऑपरेशन थिएटर बंद
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सवरेपचार रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरच्या दुरुस्तीचे काम मागील सहा महिन्यांपासून सुरू आहे. त्यामुळे अनेक रुग्णांच्या शस्त्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आल्या असून, उपचार अत्यावश्यक असलेले रुग्ण त्रस्त झाले आहेत.
सवरेपचार रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर १९५७ साली बांधण्यात आले आहे. या इमारतीला विद्युत पुरवठा करणारी व्यवस्था कुचकामी झाली, तर भिंतीही खचत होत्या. त्यामुळे शस्त्रक्रिया करण्यास डॉक्टरांना अडचणी येत होत्या. गत सहा महिन्यांपासून त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असून, त्यामुळे रुग्णांच्या शस्त्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. यामुळे रुग्णांचे आजार वाढत आहेत. तातडीच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णालयातच पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.