नेत्रतज्ज्ञांच्या विदर्भस्तरीय परिषदेला अकोल्यात सुरुवात

By Admin | Updated: October 19, 2014 01:00 IST2014-10-19T01:00:39+5:302014-10-19T01:00:39+5:30

वैद्यकीय ज्ञानातभर टाकुन लाभ रूग्णांपर्यंत पोहचविण्याचा संकल्प.

The opening of the Vidarbha Parishad of the Faculty of Optical Sciences in Akola | नेत्रतज्ज्ञांच्या विदर्भस्तरीय परिषदेला अकोल्यात सुरुवात

नेत्रतज्ज्ञांच्या विदर्भस्तरीय परिषदेला अकोल्यात सुरुवात

अकोला- वैद्यकीय क्षेत्रातील नवनवीन उपचारपद्धती, नवीन आजारांचे आवाहन याबाबत वैद्यकीय तज्ज्ञांना माहिती देऊन त्याचा रुग्णांना फायदा व्हावा, या उद्देशाने नेत्रतज्ज्ञांच्या दोन दिवसीय विदर्भ स्तरीय परिषदेला शनिवारी अकोल्यात सुरुवात झाली. अकोला अँकेडमी ऑफ ऑप्थॉल्माजीच्यावतीने सिटी स्पोर्टस् क्लब येथे नेत्रतज्ज्ञांच्या ३९ व्या विदर्भस्तरीय प्रदर्शन व परिषद आयोजित करण्यात आली आहे. परिषदेचे उद्घाटन ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. अनिल कुळकर्णी, विदर्भ ऑप्थॉल्माजी सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सैफुद्दीन हुसेन, डॉ. जुगल चिराणीया, डॉ. सरजू उनडकाट, सचिव डॉ. विश्‍वकर्मा, डॉ. शिरीष थोरात, डॉ. अभिजित वैद्य, डॉ. राजेश जोशी, डॉ. अनुराधा राठोड, डॉ. श्रीकांत मालपानी आदींच्या उपस्थित झाले. वैज्ञानिक ज्ञान वाढून रुग्णांना त्यांचा फायदा झाला पाहिजे, यासाठी अशा परिषदा सातत्याने आयोजित केल्या पाहिजे. त्यासाठी विदर्भ ऑप्थॉल्माजी सोसायटी सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे मत डॉ. सैफुद्दीन हुसेन यांनी व्यक्त केले. समाजसेवा ही खरी रुग्णसेवा असून, त्यासाठी सामूहिक प्रॅक्टीसवर डॉक्टरांनी भर दिला पाहिजे, असे आवाहन डॉ. अनिल कुलकर्णी यांनी केले.

Web Title: The opening of the Vidarbha Parishad of the Faculty of Optical Sciences in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.