मूर्त्या उघड्यावर; निर्माल्याचा खच
By Admin | Updated: September 10, 2014 01:44 IST2014-09-10T01:44:08+5:302014-09-10T01:44:08+5:30
गणेश विसर्जनानंतर मोर्णेची झाली दयनीय अवस्था.

मूर्त्या उघड्यावर; निर्माल्याचा खच
अकोला: जिल्हय़ात मोठय़ा थाटामाटात गणेश उत्सव साजरा झाला. सोमवारी रात्री उशिरापर्यंत भाविकांनी वाजत-गाजत गणेश मूर्त्यांचे मोर्णा नदीत विसर्जन केले. मंगळवारी सकाळी मात्र विसर्जन स्थळावरील चित्र भयंकर होते. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या असलेल्या मूर्त्या पाण्यात विरघळल्या नसून, नदीकाठी पडलेल्या आहेत. तसेच निर्माल्याचा खच साचला आहे.
शहरात २१६ सार्वजनिक, तर हजारो घरगुती गणेश मूर्त्यांची स्थापना करण्यात आली होती. सोमवारी सर्वांनीच गणेश मूर्त्यांचे विसर्जन केले. गणेश मूर्त्यांंच्या विसर्जनाकरिता मनपाच्या वतीने तीन ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती. सिटी कोतवालीजवळ असलेल्या गणेश घाटावर मनपाने टाके बनविले असून, या ठिकाणी विसजिर्त केलेल्या मूर्त्या कर्मचारी त्वरित काढून ट्रकमध्ये भरून गांधीग्रामला विसजिर्त करीत होते. अन्य ठिकाणी मात्र भाविकांनी स्वत: नदीत गणेश मूर्त्यांचे विसर्जन केले. वाशिम बायपासजवळील पुलाखाली भाविकांनी शेकडो गणेश मूर्त्यांंचे विसर्जन केले. या मूर्त्या मंगळवारी या ठिकाणी नदीच्या काठी पडलेल्या होत्या. तसेच नदीकिनारी निर्माल्याचा खच पडला होता. तसेच अनिकट भागात मोर्णा नदीतही भाविकांनी गणेश मूर्त्यांंचे विसर्जन केले. या ठिकाणीही मूर्त्या व निर्माल्य पडलेले होते. मूर्त्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या असल्यामुळे पाण्यात विरघळत नाहीत. पाण्याच्या प्रवाहातून त्या बाजूला सारल्या जातात व नदीकिनारी पडतात. तसेच निर्माल्यही नदीकिनारी पडलेले आहे.
** पीओपीमुळे होतात असाध्य आजार
गणेश मूर्तीला देण्यात येणार्या रंगांमध्ये मक्यरुरी, लीड या घातक रसायनांचा वापर केल्या जातो. यामुळे पाणी तर प्रदूषित होतेच सोबतच हे पाणी पिणार्या मनुष्य व प्राण्याला विविध आजारही होतात. मक्यरुरीमुळे लहान मुले गतिमंदही होऊ शक तात. दहा दिवस गणेशाची पूजा करण्याकरिता फूल व पुष्पमाळांचा उपयोग करण्यात येतो. दहा दिवसानंतर गणेश मूर्त्यांंच्या विसर्जनासोबतच हे निर्माल्यही पाण्यात विसजिर्त करण्यात येते. निर्माल्य पाण्यात सडते. त्यामुळेही पाणी दूषित होते.