शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
4
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
5
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
6
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
7
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
8
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
9
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
10
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
11
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
12
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
13
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
14
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
15
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
16
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
17
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
18
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
19
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
20
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली

‘ओपन स्पेस’चे रेकॉर्ड तयार होईना; नगररचना विभागाची कुचराई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 13:24 IST

पाच महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यावरही या विभागाने आजपर्यंत ‘ओपन स्पेस’चे रेकॉर्ड तयार केले नसल्याची माहिती समोर आली आहे.

अकोला: सर्वसामान्यांसाठी आरक्षित असणाऱ्या प्रभागातील हक्काच्या खुल्या जागांवर (ओपन स्पेस) कब्जा करून व्यवसाय उभारणाºया विविध सामाजिक-शैक्षणिक संस्थांच्या ताब्यातील भूखंड परत घेण्यासाठी मध्यंतरी मनपा प्रशासनाने बाह्यावर खोचल्या होत्या. ले-आउटचे निर्माण करणाºया मूळ विकासकांनीच खुले भूखंड बळकावले आहेत. अशा ‘ओपन स्पेस’ ताब्यात घेऊन त्यांचे रेकॉर्ड तयार करण्याचा आदेश महापालिका आयुक्त कापडणीस यांनी नगररचना विभागाला दिला होता. पाच महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यावरही या विभागाने आजपर्यंत ‘ओपन स्पेस’चे रेकॉर्ड तयार केले नसल्याची माहिती समोर आली आहे.शहराच्या विविध भागातील ले-आउटमध्ये नागरिकांच्या सार्वजनिक वापरासाठी ‘ओपन स्पेस’(खुल्या जागा) उपलब्ध नसल्याची परिस्थिती आहे. ले-आउटचे निर्माण करताना मूळ विकासकाने एकूण जमिनीच्या १० टक्के जागा स्थानिक ‘ले-आउट’धारक रहिवाशांच्या सार्वजनिक वापरासाठी खुली (ओपन स्पेस) सोडणे क्रमप्राप्त आहे, तसेच मूळ विकासकाने ले-आउटमध्ये रस्ते, नाल्या, जलवाहिनी आदी सुविधा निर्माण करणे बंधनकारक आहे. अकोला महापालिका क्षेत्रात नेमका उलटा प्रकार दिसून येत आहे. तत्कालीन नगर परिषद असो वा महापालिकेच्या कार्यकाळात निर्माण केलेल्या ले-आउटमधील ओपन स्पेसवर मूळ विकासकांनी कागदोपत्री कब्जा केला आहे. सामाजिक हिताच्या नावाखाली दुकानदारी करणाºया शैक्षणिक संस्थांनीही जागा ताब्यात ठेवल्या आहेत. यामुळे स्थानिक रहिवाशांना विविध सार्वजनिक कार्यक्रम साजरा करण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध नसल्याची परिस्थिती आहे. या प्रकाराची दखल घेत मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी संपूर्ण शहरातील ‘ओपन स्पेस’चे रेकॉर्ड तयार करण्याचा आदेश नगररचना विभागाला जारी केला होता. संबंधित विभागाने अद्यापही रेकॉर्ड तयार केले नसल्यामुळे या विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल आहे.नगररचनावर नियंत्रण कोणाचे?मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी नगररचना विभागाला दोन महिन्यांच्या आत खुल्या भूखंडांचा रेकॉर्ड तयार करण्याचा आदेश दिला होता. शहरातील अनेक भूखंड राजकीय नेते, प्रभावी नगरसेवकांनी हडप केले आहेत. आयुक्तांनी आदेश दिल्यानंतरही नगररचना विभागाकडून कुचराई होत असल्याने या विभागावर नेमके नियंत्रण कोणाचे, असा सवाल सुज्ञ अकोलेकर उपस्थित करीत आहेत.एक ना धड...आयुक्त कापडणीस यांनी शहरातील संपूर्ण मालमत्तांचा ‘डेटा’ तयार करणे, घरांचा नकाशा मंजूर करणे तसेच ‘ओपन स्पेस’चे रेकॉर्ड तयार करण्याचे नगररचना विभागाला निर्देश दिले होते. यापैकी किती कामे मार्गी लागली, याचा खुलासा या विभागाने करण्याची गरज आहे.

आयुक्त साहेब, हक्काची जागा मिळवून द्या!शहरात निर्माण केलेल्या ले-आउटमधील ‘ओपन स्पेस’ मूळ विकासकांनीच हडपल्या असून, बोटावर शिल्लक राहिलेल्या जागा शैक्षणिक संस्थांनी ताब्यात घेतल्या आहेत. अशा सामाजिक व शैक्षणिक संस्थांनी खुल्या भूखंडांचा व्यावसायिक वापर सुरू करीत दुकानदारी थाटल्याचे दिसून येते. प्रभागातील लहान मुलांना खेळण्यासाठी तसेच वयोवृद्ध नागरिकांना विरंगुळा म्हणून हक्काची जागाच शिल्लक नसल्याने आयुक्त संजय कापडणीस यांच्याकडून अपेक्षा वर्तविली जात आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका