ओपीडीत दररोज होतेय सरासरी ३०० बालरुग्णांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:23 IST2021-08-21T04:23:28+5:302021-08-21T04:23:28+5:30
कोविड चाचणीचे निर्देश नाहीत बालरुग्णांच्या कोविडच्या चाचणीसंदर्भात अधिकाऱ्यांना विचारले असता, तसे निर्देश आले नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, ...

ओपीडीत दररोज होतेय सरासरी ३०० बालरुग्णांची तपासणी
कोविड चाचणीचे निर्देश नाहीत
बालरुग्णांच्या कोविडच्या चाचणीसंदर्भात अधिकाऱ्यांना विचारले असता, तसे निर्देश आले नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, गरज भासल्यास काही मुलांची कोविड चाचणी करण्यात आली असून, त्यांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचेही त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
जीएमसीत ३० बालरुग्ण दाखल
सर्वोपचार रुग्णालयातील बालरुग्ण विभागात सद्यस्थितीत सुमारे ३० बालरुग्ण दाखल असल्याची माहिती आहे. यातील बहुतांश रुग्णांना व्हायरल इन्फेक्शनचा ताप असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. उपचारामुळे या रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणाही येत असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात व्हायरल इन्फेक्शनच्या रुग्णांचे प्रमाण वाढले असून यामध्ये बालरुग्णांचे प्रमाण लक्षणीय आहे. बहुतांश डेंग्यूसदृश रुग्ण आढळून येत असून, त्यांची चाचणीदेखील केली जात आहे. गरज भासल्यास रुग्णांची कोविड चाचणीही केली जात आहे.
- डॉ. विनीत वरठे, विभाग प्रमुख, बालरोग विभाग, जीएमसी, अकोला