शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडात केवळ ४०.८७ टक्केच जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 15:26 IST

अकोला : पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) पाच जिल्ह्यांत आजमितीस ११ आॅगस्टपर्यंत पाच जिल्ह्यांत ४०.८७ टक्के जलसाठा संचयित झाला.

ठळक मुद्देपश्चिम विदर्भात नऊ मोठे, २४ मध्यम, तर ४५२ लघू प्रकल्प आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील तीन धरणांतील जलसाठा शून्य टक्केच आहे. काटेपूर्णा या मोठ्या धरणात ३६.७७ टक्के जलसाठा संकलित झाला आहे.

अकोला : पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) पाच जिल्ह्यांत आजमितीस ११ आॅगस्टपर्यंत पाच जिल्ह्यांत ४०.८७ टक्के जलसाठा संचयित झाला. पावसाचे अडीच महिने संपत आले असताना धरणात अल्प जलसाठा असल्याने आता वऱ्हाडातील जनतेला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.पश्चिम विदर्भात नऊ मोठे, २४ मध्यम, तर ४५२ लघू प्रकल्प आहेत. या सर्व धरणात ४०.८७ जलसाठा सध्या उपलब्ध आहे. बुलडाणा जिल्ह्यातील तीन धरणांतील जलसाठा शून्य टक्केच आहे. अकोला शहराची जीवनवाहिनी असलेल्या काटेपूर्णा या मोठ्या धरणात ३६.७७ टक्के जलसाठा संकलित झाला आहे. याच जिल्ह्यातील निर्गुणा मध्यम धरणात ४३.२२ टक्के जलसाठा झाला आहे. उमा ३२.०२, मोर्णा धरणात २२.४१ टक्के, तर वान धरणात आतापर्यंत ५४.९६ टक्के जलसाठा संकलित झाला. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा मोठ्या धरणातील जलसाठा संपला असून, अद्याप एक थेंबही वाढ झाली नसल्याने या धरणाची पातळी शून्य टक्के आहे. याच जिल्ह्यातील मस व कोराडी मध्यम धरणातील जलसाठा शून्य टक्के आहे. तोेरणा ८.८७, तर उतावळी धरणातील पातळी १७.२३ टक्के झाली आहे. याच जिल्ह्यातील नळगंगा या मोठ्या धरणात ९.७७ टक्के, पेनटाकळी धरणात ४.८७ टक्के, ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात १५.५० टक्के, पलढगमध्ये १२.६५ टक्के, मन धरणात १६.४८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ६१.२८ टक्के, एकबुर्जी धरणात १०० टक्के, तर सोनल धरणात ४४.०३ टक्के जलसाठा आहे.अमरावती जिल्ह्यातील ऊर्ध्व वर्धा धरणात ४५.६० टक्के, यवतमाळ जिल्ह्यातील पूसमध्ये ९८.९३, अरुणावती ३४.४१, तर बेंबळा धरणात ४३.६६ टक्केच जलसाठा आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरणnalganga damनळगंगा धरणbuldhanaबुलडाणा