जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणाच्या केवळ २५ उपाययोजनांची कामे पूर्ण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:18 IST2021-05-08T04:18:42+5:302021-05-08T04:18:42+5:30
अकोला: जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांपैकी ७ मेपर्यंत जिल्ह्यातील केवळ २२ गावांत २५ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात ...

जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणाच्या केवळ २५ उपाययोजनांची कामे पूर्ण !
अकोला: जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांपैकी ७ मेपर्यंत जिल्ह्यातील केवळ २२ गावांत २५ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित ६७४ उपाययोजनांची कामे अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाची कामे पूर्ण होणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात जिल्ह्यातील ६३१ गावांमध्ये ६९९ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या असून, उपाययोजनांच्या कामांकरिता १४ कोटी ९० लाख २९ हजार रुपये अपेक्षित खर्चाच्या कृती आराखड्यास जिल्हाधिकाऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वी मंजुरी दिली आहे. कृती आराखड्यात प्रस्तावित पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांचे प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात येत आहेत. प्रशासकीय मान्यतेनंतर पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची कामे सुरू करण्यात येत आहेत. त्यामध्ये ७ मेपर्यंत जिल्ह्यातील २२ गावांत केवळ २५ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित ६७४ उपाययोजनांची कामे अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांची उर्वरित कामे केव्हा पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पूर्ण करण्यात आलेली
उपाययोजनांची अशी आहेत कामे!
जिल्ह्यातील २२ गावांत पाणीटंचाई निवारणासाठी २५ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली. त्यामध्ये १४ गावांसाठी १६ खासगी विहिरींचे अधिग्रहण आणि ८ गावांत ९ कूपनलिकांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
१८७ उपाययोजनांच्या कामांना
प्रशासकीय मान्यता!
पाणीटंचाई कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनापैकी २७३ गावांसाठी १८७ उपाययोजनांच्या कामांना जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यापैकी आतापर्यंत केवळ २२ गावांत २५ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली.
पावसाळा २३ दिवसांवर;
उपाययोजना पूर्ण होणार?
पावसाळा सुरू होण्यास केवळ २३ दिवसांचा कालावधी उरला आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर पाणीटंचाई निवारणाची कामे करता येणार नाहीत. त्यानुषंगाने जिल्हयातील पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांपैकी प्रलंबित उपाययोजनांची कामे येत्या २३ दिवसांत पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.