समारंभात दिवसभरही दिसतात फक्त २५ वऱ्हाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:33 IST2021-03-04T04:33:03+5:302021-03-04T04:33:03+5:30

अकोला : जिल्ह्यात कोरोनाची संख्या वाढल्याने पुन्हा सार्वजनिक कार्यक्रम, मंगल कार्यालये, सभागृह बंद ठेवण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आहेत, तर नियोजित ...

Only 25 brides are seen in the ceremony throughout the day | समारंभात दिवसभरही दिसतात फक्त २५ वऱ्हाडी

समारंभात दिवसभरही दिसतात फक्त २५ वऱ्हाडी

अकोला : जिल्ह्यात कोरोनाची संख्या वाढल्याने पुन्हा सार्वजनिक कार्यक्रम, मंगल कार्यालये, सभागृह बंद ठेवण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आहेत, तर नियोजित विवाह सोहळ्यांना केवळ २५ लोकांना परवानगी आहे; मात्र विवाह समारंभातील वऱ्हाडींची गर्दी ३०० ते ४०० पेक्षा कमी झालेली नाही. काहींनी टप्प्याटप्प्याने पाहुण्यांना वेळेनुसार बोलावून समारंभ साजरा करण्याची नवीन शक्कल लढविली आहे. समारंभ परवानगीनुसारच पार पडत असले, तरी कधीही गेले तरी पाहुणे २५ एवढेच दिसतील, अशी रीतसर व्यवस्था केली जात आहे.ोोोो

जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढल्याने १ ते ८ मार्चपर्यंत लॉकडाऊनचे आदेश आहेत. जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना युद्धस्तरावर राबविण्यात येत आहे. ‘नो मास्क, नो एन्ट्री’ असे फलक शासकीय ते खासगी आस्थापनेमध्ये झळकू लागले आहेत. वाहनचालकापासून तर सर्वसामान्य रस्त्यावर फिरणाऱ्या व्यक्तींना मास्क आवश्यक आहे. विवाह समारंभ, सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली असून, केवळ विवाहाला लॉकडाऊन नसलेल्या ठिकाणी २५ लोकांना परवानगी देण्यात येत आहे; मात्र यातूनही विवाह सोहळे करणाऱ्यांनी शक्कल लढविली आहे. आलेल्या पाहुण्यांना नजीकच्या परिसरात ठेवून राहत्या घरातच समारंभ परवानगीनुसारच पार पडत असल्याचा आभास करीत आहेत. आलेल्या पाहुण्यांपैकी केवळ पंगत बसली, की आणायचे, पुन्हा त्यांचे जेवण आटोपले की, नव्या २५ जणांना बोलाविण्यात येत आहे. पालिकेचे तपासणी पथक गेल्यास त्यांना सर्व काही आलबेल दिसेल, अशी ही शक्कल लढविली जात आहे.

विवाह आधी जुळलेल्यांची अडचण

लॉकडाऊन काळात होणारे विवाह किमान दोन-तीन महिन्यांपूर्वी जुळलेले आहेत. त्यानुसार, नातेवाईक, मित्रमंडळींना पत्रिका पाठविण्यात आल्या. मंगल कार्यालयाला २०० ते ३०० वऱ्हाडींच्या भोजनाची व अन्य सुविधांसाठी अ‍ॅडव्हान्स रक्कम देण्यात आली. आता अगदी वेळेवर गत आठवड्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. तो ८ मार्चपर्यंत वाढविण्यातही आला. त्यामुळे आता कुणाला बोलवायचे, कुणाला टाळायचे, असा पेच निर्माण झाला.

Web Title: Only 25 brides are seen in the ceremony throughout the day