शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

शाळांची नोंदणी झाल्यानंतरच २५ टक्के प्रवेश; ‘आरटीई’अंतर्गत अकोला जिल्हय़ातील १९५ शाळांचीच नोंदणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 01:08 IST

अकोला : शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत येत्या शैक्षणिक सत्र २0१८-१९ साठी प्राथमिक शिक्षण विभागाकडून इंग्रजी माध्यमांच्या शाळांची १९ जानेवारीपासून नोंदणी सुरू आहे. आरटीई अंतर्गत इंग्रजी माध्यमांच्या शाळांची नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच या शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांसाठी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हय़ातील पालकांना प्रवेशासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

ठळक मुद्दे नोंदणीनंतरच प्रवेशासाठीचे वेळापत्रक 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत येत्या शैक्षणिक सत्र २0१८-१९ साठी प्राथमिक शिक्षण विभागाकडून इंग्रजी माध्यमांच्या शाळांची १९ जानेवारीपासून नोंदणी सुरू आहे. आरटीई अंतर्गत इंग्रजी माध्यमांच्या शाळांची नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच या शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांसाठी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हय़ातील पालकांना प्रवेशासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरवर्षी प्राथमिक शिक्षण विभागाकडून शिक्षण हक्क कायद्यानुसार वंचित घटकांतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, सर्व जाती, धर्मातील दिव्यांग मुले, तसेच दुर्बल घटकांतर्गत कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपर्यंत असणारे, खुल्या प्रवर्गासह विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग आणि अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना जिल्हय़ातील नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवर ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया येते. यंदा सत्र २0१८-१९ साठी सुद्धा २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यासाठी आरटीई अंतर्गत इंग्रजी शाळांची सध्या नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत जिल्हय़ातील १९५ इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, आणखी २८ शाळांची आरटीई अंतर्गत नोंदणी होणे बाकी आहे. जिल्हय़ातील २२३ शाळांच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच प्राथमिक शिक्षण विभागाला पुणे येथून २५ टक्के राखीव जागांच्या प्रवेशाचे वेळापत्रक देण्यात येईल. त्यानंतरच खर्‍या अर्थाने प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. सध्या जिल्हय़ात आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाही. याची पालकांनी नोंद घ्यावी, अशी माहिती शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी दिली. 

यामुळे उघडत नाही संकेतस्थळअकोला जिल्हय़ातील इंग्रजी माध्यमांच्या आरटीई अंतर्गत नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. २५ टक्के प्रवेशासाठीचे संकेतस्थळ उघडत नसल्याची ओरड पालक करीत आहेत. शाळांची नोंदणीची प्रक्रिया आटोपल्यानंतरच संकेतस्थळ सुरू होईल आणि जिल्हय़ात २५ टक्के प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारल्या जातील. 

जिल्हय़ामध्ये आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाही.  आरटीई अंतर्गत इंग्रजी शाळांच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच २५ टक्के प्रवेशाचे वेळापत्रक देण्यात येईल. त्यानंतरच पालकांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज भरावेत. - प्रशांत दिग्रसकर,शिक्षणाधिकारी, प्राथमिक 

टॅग्स :educationशैक्षणिकAkola cityअकोला शहरAkola Ruralअकोला ग्रामीणSchoolशाळा