शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडातील ४८४ धरणात केवळ १४ टक्के जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 17:25 IST

अकोला : पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड)) मध्यम व लघु मिळून ४८४ (प्रकल्प)धरण आहेत. मे अखेर या धरणात केवळ १४.९५ टक्के जलसाठा शिल्लक असून, आठ धरणात शून्य तर ११ धरणातील जलसाठा शेवटच्या घटका मोजत आहे.

ठळक मुद्देतीन जिल्ह्यांतील १८ धरणांपैकी एक मोठा व आठ मध्यम धरणातील जिवंत जलसाठा संपला असून, या धरणांची पातळी शून्य टक्के आहे. तर १० मध्यम प्रकल्पात जलसाठा संपण्याच्या मार्गावर आहे. अकोलेकरांची लाइफ लाइन असलेल्या काटेपूर्णा धरणात तर आजचा उपयुक्त जलसाठा १.८० टक्केच आहे.

अकोला : पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड)) मध्यम व लघु मिळून ४८४ (प्रकल्प)धरण आहेत. मे अखेर या धरणात केवळ १४.९५ टक्के जलसाठा शिल्लक असून, आठ धरणात शून्य तर ११ धरणातील जलसाठा शेवटच्या घटका मोजत आहे. यामुळेच शेतकऱ्यांसह सर्वंच पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील धरणातील जलसाठ्याची स्थिती वाईट आहे. या तीन जिल्ह्यांतील १८ धरणांपैकी एक मोठा व आठ मध्यम धरणातील जिवंत जलसाठा संपला असून, या धरणांची पातळी शून्य टक्के आहे. तर १० मध्यम प्रकल्पात जलसाठा संपण्याच्या मार्गावर आहे. अकोलेकरांची लाइफ लाइन असलेल्या काटेपूर्णा धरणात तर आजचा उपयुक्त जलसाठा १.८० टक्केच आहे. यात अर्धा गाळ असल्याने अकोलेकरांवरील जलसंकट गडद झाले आहे. याच जिल्ह्यातील मोर्णा धरणात ८.६३ टक्के तर निर्गुणा व उमा धरणात शून्य टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणातील जलसाठा संपला असून, याच जिल्ह्यातील मस व कोराडी धरणातील जलसाठा शून्य टक्के आहे. आता तोेरणा व उतावळी धरणातील पातळी शून्य टक्क्यावर पोहोचली. वाशिम जिल्ह्यातील सोनल धरणात शून्य टक्के आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा या मोठ्या धरणात १३.५९ टक्के, पेनटाकळी धरणात ४.२२ टक्के, ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात २३.२८ टक्के, पलढगमध्ये ११.७२ टक्के, मन धरणात ७.६६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये १२.१६ टक्के तर एकबूर्जी धरणात ३.५१ टक्के जलसाठा शिल्लक आहे.  आठ धरणात शून्य साठा ;११ धरणतील साठा संपण्याच्या मार्गावरवऱ्हाडतील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यात ९ मोठे व २४ मध्यम धरण आहेत. अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा ३४.९० टक्के, अकोला जिल्ह्यातील वाण ६२.९७ टक्के मोठ्या धरणातील ही २०. २८ टक्के वारी आहे. २४ मध्यम प्रकल्पातील अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील पाच प्रकल्पात सरासरी २५ ते ३५ टक्के जलसाठा आहे. ४५२ लघु प्रकल्पात ७.०३ टक्के जलसाठा आहे. लघु प्रकल्पाचा जलसाठा पिण्यासाठी वापरला जात नसल्याने हा ७ टक्के जलसाठा १४.९५ टक्क्यातून वजा केल्यास जलसाठ्याचे चित्र भीषण आहे. अकोला, बुलडाणा व वाशिम या जिल्ह्यांची स्थिती मात्र प्रचंड वाईट आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाVidarbhaविदर्भDamधरण