शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
2
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
3
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
4
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
5
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
6
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
7
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
8
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
9
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
10
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
11
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
12
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
13
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
14
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
15
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
16
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
17
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
18
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
19
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
20
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते

वऱ्हाडातील धरणांमध्ये केवळ १२ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 13:49 IST

अकोला शहराची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात ११ टक्केच जलसाठा उपलब्ध असल्याने टंचाईचे चित्र आणखी गडद झाले.

ठळक मुद्देवºहाडातील पाच जिल्ह्यांतील धरणांतील जलसाठाही संपण्याच्या मार्गावर आहे.गतवर्षी अल्प पाऊस झाल्याने यातील बहुतांश धरणात अल्प जलसाठा संचयित झाला होता. आजमितीस या सर्व धरणांमध्ये १२.५१ टक्केच साठा आहे.

अकोला : हलक्या अल-निनोच्या प्रभावामुळे यावर्षी पुन्हा आठ ते दहा दिवस पाऊस लांबल्याचे भाकीत डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामानशास्त्र विभागाच्यावतीने वर्तविल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असताना वºहाडातील पाच जिल्ह्यांतील धरणांतील जलसाठाही संपण्याच्या मार्गावर आहे.आजमितीस या धरणांमध्ये केवळ १२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अकोला शहराची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात ११ टक्केच जलसाठा उपलब्ध असल्याने टंचाईचे चित्र आणखी गडद झाले.वºहाडातील अकोला, वाशिम, बुलडाणा, अमरावती व यवतमाळ या पाच जिल्ह्यांत ९ मोठे, २४ मध्यम व ४६९ लघू प्रकल्प आहेत. तथापि, गतवर्षी अल्प पाऊस झाल्याने यातील बहुतांश धरणात अल्प जलसाठा संचयित झाला होता. आजमितीस या सर्व धरणांमध्ये १२.५१ टक्केच साठा आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात तर अपेक्षित पावसाच्या अर्धाही पाऊस झाला नसल्याने या जिल्ह्याची तहान सध्या टँकरवर भागविली जात आहे. बुलडाणा जिल्ह्यातील धरणांची स्थिती बघितल्यास पेनटाकळी व खडकपूर्णा ही मोठी धरण शून्य टक्क्यावर आहेत. नळगंगा मोठ्या धरणात केवळ ७.६३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मध्यम धरणातील मस, कोराडी व तोरणा शून्य टक्क्यावर आहे. ज्ञानगंगा धरणात ६.४८ टक्के, पलढग ८.९२ टक्के, मन १३.४७ टक्के, तर उतावळी धरणात १८.९० टक्के साठा आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा मोठ्या धरणात ११.४ टक्के, वाणमध्ये ३१.५१ तर मध्यम धरणातील निर्गुणा व घुगंशी बॅरेज शून्य टक्क्यावर आहे. उमा धरणात केवळ १.२८ टक्के तर मोर्णा धरणात १०.२३ टक्केच साठा आहे. वाशिम जिल्ह्यातील सोनल शून्य टक्के, अडाण ५.८६ तसेच एकबुर्जी धरणात केवळ ६.७७ टक्के जलसाठा आहे. अमरावती जिल्ह्यातील अपर वर्धा धरणाची पातळी खोल गेली असून, या धरणात केवळ १४.५७ टक्केच साठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस धरणात २३.०८,अरुणावतीमध्ये ८.९५ तर बेंबळा या धरणामध्ये १९.३८ टक्केच साठा आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरणkhadakpurna prakalpa/sant chokhamela damखडकपूर्णा प्रकल्प/ संत चोखामेळा सागरwater scarcityपाणी टंचाई