‘आॅनलाइन’ अर्जासाठी प्रशासनाचा आटापिटा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 23:27 IST2017-08-26T23:26:32+5:302017-08-26T23:27:49+5:30
महिनाभरात केवळ एक हजार शेतक-यांचे भरले अर्ज

‘आॅनलाइन’ अर्जासाठी प्रशासनाचा आटापिटा!
संतोष येलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकºयांचे ‘आॅनलाइन’ अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत गत महिनाभराच्या कालावधीत जिल्ह्यात केवळ दहा हजार सहा शेतकºयांचे अर्ज भरण्यात आले.
आॅनलाइन अर्ज भरण्याची मुदत केवळ २० दिवसांवर आली असताना, जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकºयांचे कर्जमाफीचे आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाने आटापिटा सुरू केला आहे.
सन २००९ ते ३० जून २०१६ पर्यंत राज्यातील थकबाकीदार शेतकºयांसाठी दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकºयांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार असून, कर्जाची नियमित परतफेड करणाºया शेतकºयांना २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान आणि कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेल्या शेतकºयांना विशेष योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यानुषंगाने थकबाकीदार शेतकºयांचे ‘आॅनलाइन’ अर्ज शासनाच्या ‘आपले सरकार’ या संकेतथळावर भरून घेण्याची प्रक्रिया गत २४ जुलैपासून जिल्ह्यातील महा ई-सेवा केंद्र, सामूहिक सेवा केंद्र (सीएससी) व आपले सरकार सेवा केंद्र इत्यादी सेतू केंद्रांवर सुरू करण्यात आली आहे.
जिल्ह्यात एकूण ७१ हजार ३७९ थकबाकीदार शेतकरी असून, त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे १४ हजार २७२ आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या ५७ हजार १०७ थकबाकीदार शेतकºयांचा समावेश आहे. गत महिनाभराच्या कालावधीत २४ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकºयांपैकी केवळ १० हजार ६ थकबाकीदार शेतकºयांचे कर्जमाफीचे आॅनलाइन अर्ज भरून घेण्यात आले
असून, जिल्ह्यातील उर्वरित थकबाकीदार शेतकºयांचे आॅनलाइन अर्ज भरणे बाकी आहेत. कर्जमाफीचे आॅनलाइन अर्ज भरण्याची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत आहे. त्यानुसार शेतकºयांचे आॅनलाइन अर्ज भरण्यास केवळ २० दिवसांचा कालावधी उरला आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकºयांचे कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी, आता जिल्हा प्रशासनामार्फत आटापिटा सुरू करण्यात आला आहे. त्यामध्ये जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार प्रामुख्याने सुटीच्या दिवशीही सेतू केंद्र सुरू ठेवून, कर्जमाफीचे शेतकºयांचे आॅनलाइन अर्ज भरणे, आॅनलाइन अर्ज भरण्यात येणाºया अडचणी दूर करणे, आॅनलाइन अर्ज भरताना शेतकºयांचा अंगठा
घेण्यासाठी बायोमेट्रिक मशीन सेतू केंद्रांना वितरित करणे, तहसील कार्यालयांमध्ये अतिरिक्त संगणक संच बसवून कर्जमाफीचे अर्ज भरणे इत्यादी उपाययोजना करण्यात येत आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आली गती!
कर्जमाफी योजनेंतर्गत शेतकºयांचे आॅनलाइन अर्ज भरण्याचे काम १५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २४ आॅगस्ट रोजी ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे जिल्हाधिकाºयांना दिला. त्यानुसार जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकºयांचे कर्जमाफीचे आॅनलाइन अर्ज भरण्याचे काम जलद गतीने करण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी २५ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील
तहसीलदारांना दिला. त्यामुळे कर्जमाफीचे आॅनलाइन अर्ज भरण्याच्या कामाला गती आली आहे.
देखरेख करण्यासाठी कर्मचारी नियुक्त करा
जिल्हाधिकाºयांचा तहसीलदारांना आदेश!
शेतकºयांचे कर्जमाफीचे आॅनलाइन अर्ज भरण्याच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी तहसील कार्यालयातील एक कर्मचारी नियुक्त करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्ह्यातील सातही तहसीलदारांना दिला आहे. तसेच अर्ज भरण्यासाठी शेतकºयांची होणारी गर्दी बघता, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे निर्देशही
जिल्हाधिकाºयांनी दिले.
अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यावर प्रश्नचिन्ह!
थकबाकीदार शेतकºयांचे कर्जमाफीचे आॅनलाइन अर्ज भरण्यास २० दिवसांचा कालावधी उरला आहे. आॅनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेतील संथ गती लक्षात घेता, अर्ज भरण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आटापिटा सुरू केला असला, तरी २० दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील ६१ हजार ३७३ थकबाकीदार शेतकºयांचे कर्जमाफीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आॅनलाइन अर्ज भरण्यात अनंत अडचणी!
आॅनलाइन अर्ज भरताना वारंवार ‘सर्व्हर डाउन’ होणे, नेट कनेक्टिव्हिटीचा अभाव, ‘आपले सरकार’ वेबसाइट वारंवार बंद पडणे, अशा अनेक कारणांमुळे शेतकºयांचे कर्जमाफीचे आॅनलाइन अर्ज भरून घेण्यात अनंत अडचणी येत आहेत. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी प्रतीक्षा करणाºया अनेक शेतकºयांना अर्ज न भरताच घरी परतावे लागत आहे.