कांद्याला मिळणार प्रतिक्विंटल १४00 रूपये भाव !
By Admin | Updated: November 24, 2014 00:04 IST2014-11-24T00:04:20+5:302014-11-24T00:04:20+5:30
केंद्रीय कृषी विपणन केंद्राचा अंदाज.

कांद्याला मिळणार प्रतिक्विंटल १४00 रूपये भाव !
अकोला : कांद्याचे उत्पन्न आणि किंमतीचा कल या सर्व गोष्टींचा विचार करू न कांद्याला या महिन्यात प्रतिक्विंटल १३00 ते १४00 रू पये भाव मिळण्याची शक्यता केंद्रीय कृषी विपणन केंद्राने वर्तविली आहे; पण आयात- निर्यात धोरण आणि हवामानात बदल झाला तर या किंमतीवर परिणाम होण्याची शक्यताही या विपणन केंद्राने वर्तविली आहे. कांदा उत्पादनाच्याबाबतीत महाराष्ट्र राज्य देशात अग्रगण्य असून, २0१३-१४ मधील कांदा उत्पादनाचा वाटा हा ३0 टक्के आहे. राज्यात कांद्याचे क्षेत्र नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, सोलापूर व नागपूर जिल्हयामध्ये आहे. बागायती मंडळाच्या अहवालानुसार २0१३-१४ मध्ये या राज्यात कांद्याचे लागवडीखालील क्षेत्र हे ४.६८ लाख हेक्टर व उत्पादन ५८.६७ लाख टन आहे. २0१२-१३ मध्ये कांद्याचे क्षेत्र २.६ लाख हेक्टर होते आणि उत्पादन ४६.६0 लाख टन एवढे होते. इतर जिल्हयात कांद्याचे क्षेत्र वाढत आहे. ा कांद्याचे उत्पन्न व किंमतीचा कल या सर्व गोष्टीचा विचार करू न डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अर्थशास्त्र व सांख्यिकी विभागातंर्गत असलेल्या (एनकॅप) केंद्रीय कृषी विपणन केंद्राने कांद्याच्या लासलगाव बाजारपेठेतील मागील २३ वर्षाच्या कालावधीतील मासीक सरासरी किंमतीचे पृथ्थकरण केले आहे. या अभ्यासाच्या निष्कर्षानुसार सध्या असलेली बाजारपेठेतील स्थिती कायम राहिल्यास सामान्य हवामानात वेगवेगळ्य़ा प्रतिनुसार चालू महिन्यात कांद्याच्या सरासरी किंमती प्रतिक्विंटल १३00 ते १४00 रूपये राहण्याची शक्यता या के ंद्राने वर्तविली आहे. आयात निर्यात धोरण आणि हवामान बदलाचा परिणाम मात्र कांद्याच्या किंमतीवर होवू शकतो, असे या केंद्राने म्हटले आहे. कृषी विद्यापीठाच्या कृषी अर्थशास्त्र व सांख्यिकी विभागाचे प्रमुख श्रीकांत काकडे यांनी कांदयाचे भाव हे १३00 ते १४00 प्रतिक्विंटल राहण्याची शक्यता आहे. पंरतु आयात -निर्यात धोरण आणि हवामान बदलाचा परिणाम कांद्याच्या किंमतीवर होण्याची शक्यता असते, त्यादृष्टीने शेतकर्यांना विक्री व साठवणुकीचा योग्य निर्णय घेता यावा, यासीठी ही माहिती दिली आहे.