ट्रॅक्टरचालकास एक वर्षाची शिक्षा

By Admin | Updated: February 11, 2015 00:58 IST2015-02-11T00:58:28+5:302015-02-11T00:58:28+5:30

भरधाव वाहन चालवून एकाच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरेलेल्या चालकास एक वर्षाची शिक्षा.

One year's education for tractorchalkas | ट्रॅक्टरचालकास एक वर्षाची शिक्षा

ट्रॅक्टरचालकास एक वर्षाची शिक्षा

जळगाव जा. (बुलडाणा) : भरधाव वाहन चालवून एकाच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरल्याचा तसेच दुसर्‍याला जखमी केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने सैयद अहमद अली सैयद असगर अली (३७ रा. मेहकर) या ट्रॅक्टरचालकाला एक वर्षाची कैद प्र थमवर्ग न्यायाधीश ए. पी. खानोरकर यांनी ठोठावली.
२३ जानेवारी २00८ रोजी प्रकाश बळीराम माजरे व देविदास माजरे (रा.वडगाव गड) हे बचतगटाच्या कामानिमित्त वडगाव-हाशमपूर (ता. जळगाव) येथून हनवतखेड येथे जात होते. त्यावेळी त्यांना ट्रॅक्टरचा (क्रमांक एमपी १२ एम १२९0) चालक सैय्यद अहमद अली सैय्यद असगर अली (३७ रा. मेहकर) याने भरधाव चालवून धडक दिली होती. यामध्ये प्रकाश माजरे हे ठार झाले, तर देविदास माजरे हे जखमी झाले होते. याबाबत संतोष रामदास माजरे यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यानंतर या घटनेचा एएसआय अशोक चव्हाण यांनी तपास केल्यानंतर आरोपी सैयद अहमद अली याच्याविरुद्ध प्रकरण जळगाव जा. येथील न्यायालयात न्यायप्रविष्ठ करण्यात आले होते. यामध्ये सरकार पक्षाच्यावतीने सात साक्षीदार तपासण्यात आले. असलेले पुरावे व सरकारी वकील एम. एस. खरात यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीश ए. पी. खानोरकर यांनी आरोपीस भादंविचे कलम ३0४ नुसार दोषी ठरवत एक वर्षे साधी कैद व २७९ भादंविनुसार तीन महिने कारावास, कलम ३३७ नुसार तीन महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली. १५ हजार रुपये प्रकाश माजरेंची पत्नी व १५ हजार जखमी देविदास माजरे यांना नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेश दिला.

Web Title: One year's education for tractorchalkas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.