एका वर्षात ३० टक्के, तर किराणा ४० टक्क्यांनी महागला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:17 AM2021-05-17T04:17:16+5:302021-05-17T04:17:16+5:30

मागील सव्वा वर्षापासून कोरोनामुळे नागरिक हैराण झाले आहेत. दररोज रुग्णांची होणारी वाढ चिंता निर्माण करणारी आहे. यामध्ये महागाईचा भडका ...

In one year, groceries went up by 30 per cent and groceries by 40 per cent! | एका वर्षात ३० टक्के, तर किराणा ४० टक्क्यांनी महागला!

एका वर्षात ३० टक्के, तर किराणा ४० टक्क्यांनी महागला!

Next

मागील सव्वा वर्षापासून कोरोनामुळे नागरिक हैराण झाले आहेत. दररोज रुग्णांची होणारी वाढ चिंता निर्माण करणारी आहे. यामध्ये महागाईचा भडका उडत आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे बहुतांश नागरिक बेरोजगार आहेत. घरखर्चाची चिंताही त्यांना सतावत आहे. अशात पेट्रोल-डिझेलच्या दरात भडका उडत आहे. त्यामुळे वाहन चालविणे कठीण होऊन बसले आहे. सध्या रोज पेट्रोल-डिझेलच्या किमती बदलत असल्यामुळे रोज किमतीमध्ये चढ-उतार होत आहे. वर्षभरामध्ये डिझेलच्या दरात ३० टक्के वाढ नोंदविल्या गेली. गतवर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी महिन्यात डिझेलचा दर ७०.०५ होता. यासोबत किराणा खर्चही वाढल्याने नागरिक चिंतित आहे. तेलाच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्याने महागाईची झळ सोसावी लागत आहे.

--कोट--

काय म्हणतात गृहिणी...

कोरोनाकाळात सर्व व्यवसाय बंद आहे. त्यामुळे घरात पैशाची चणचण जाणवत आहे. आता किराणा सामानही महागले असल्याने घरचे बजेट कोलमडले आहे. घरखर्च भागविणे कठीण झाले आहे.

- मिताली पाटील

--कोट--

मागील तीन महिन्यात तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या. त्यामुळे सणाला विविध पदार्थ बनविणे कठीण होत आहे. घरखर्च वाढला असून, गॅसच्या किमतीही वाढल्या आहे.

- विजया खाडे

--कोट--

दाळ, तांदूळ, बेसनच्या किमती वाढल्या आहे. त्यात तेलाच्या किमतीही दुप्पट झाल्या आहे. कोरोनामुळे संचारबंदी असल्याने पुरवठ्यावरही परिणाम होत आहे. तेलाच्या किमतीत तेजी कायम राहण्याची शक्यता आहे.

- राजू शेळके, किराणा व्यावसायिक

--पॉइंटर--

किराणा दर (प्रतिकिलो) मार्च २० सप्टेंबर २० मे २१

तूरदाळ ८२ ८६ १०४

हरभरा दाळ ५४ ६२ ६८

तांदूळ ५० ६० ६५

साखर ३४ ३५ ३६

गूळ ३८ ४२ ४५

बेसन ६० ७० ८०

--बॉक्स--

तेलही दुप्पट महाग (दर प्रतिलिटर)

तेल मार्च २० सप्टेंबर २० मे २१

शेंगदाणा १४२ १५० १७०

सूर्यफूल ९० १२६ १७२

करडी १५० १७० २१०

सोयाबीन ८४ १०२ १६०

--पॉइंटर--

डिझेल दराचा भाव (प्रतिलिटर)

जानेवारी २०२० ७०.०५

जून २०२० ६५.२४

जानेवारी २०२१ ७९.४०

मे २०२१ ८९.०५

Web Title: In one year, groceries went up by 30 per cent and groceries by 40 per cent!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.