शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

इच्छुक उमेदवारांसाठी एक खिडकी योजना सुरूच नाही !

By admin | Updated: January 28, 2017 01:55 IST

अकोल्यातील स्थिती; कागदपत्रांची जुळवाजुळव करताना दमछाक.

अकोला, दि. २७- महापालिका निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज सादर करणार्‍या इच्छुक उमेदवारांची वेळेवर होणारी धावपळ लक्षात घेता, त्यांच्या सुविधेसाठी झोननिहाय गठित करण्यात आलेल्या निवडणूक कार्यालयात एक खिडकी योजना सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी दिले होते. उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या पहिल्या दिवशी एक खिडकी योजना सुरूच केली नसल्यामुळे इच्छुकांची दमछाक झाली. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, महापालिका निवडणुकीसाठी २७ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. झोननिहाय गठित केलेल्या पाच निवडणूक कार्यालयांमध्ये इच्छुकांना सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. यादरम्यान, प्रचार सभा, रॅली, होर्डिंग्ज, बॅनर, फलक, प्रचार वाहने आदी विविध विषयांसाठी उमेदवारांना महापालिकेची रीतसर परवानगी घ्यावी लागते. या सर्व परवानग्या एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशातून प्रत्येक निवडणूक कार्यालयात एक खिडकी योजना कार्यान्वित करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी निवडणूक विभागाला दिले होते. उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या पहिल्या दिवशी निवडणूक कार्यालयात एक खिडकी योजना कार्यान्वित केले नसल्याचे चित्र समोर आले. धावपळ अन् संभ्रमउमेदवारांनी अर्जासोबत दोन शपथपत्रे सादर करायची आहेत. मालमत्तेसंबंधी विवरण आणि गुन्हे दाखल असल्यास त्याची माहिती अर्जासोबत जोडून देणे क्रमप्राप्त आहे. २00२ नंतर तीनपेक्षा जास्त अपत्ये नसल्याचा दाखला उमेदवारी अर्जासोबत जोडावा लागेल. खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते उघडून त्याद्वारे खर्चाच्या नोंदी कराव्या लागतील. एबी फॉर्म उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंंत जमा करण्याची सवलत यंदा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती आहे. ही माहिती देताना निवडणूक कार्यालयांमध्ये एकवाक्यता नसल्यामुळे इच्छुकांना नाहक धावपळ करावी लागत असण्यासोबतच कागदपत्रांसंदर्भात संभ्रमाची स्थिती निर्माण केली जात आहे.रविवारी भरता येणार उमेदवारी अर्जनिवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना यंदा ऑनलाइन प्रणालीद्वारे उमेदवारी अर्ज सादर करावा लागेल. त्याची प्रिंटआउट काढून निवडणूक कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे सादर करावी लागेल. उमेदवारी अर्ज भरण्याचा कमी कालावधी लक्षात घेता, रविवारी (२९ जानेवारी)देखील उमेदवारी अर्ज भरण्याची सुविधा राज्य निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे.