अकोल्यात एकाची दगडाने ठेचून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:18 IST2021-03-08T04:18:52+5:302021-03-08T04:18:52+5:30

अकोला : शहरातील नेहरु पार्क परिसरात अज्ञातांनी एकाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. खदान पोलीस ...

One was stoned to death in Akola | अकोल्यात एकाची दगडाने ठेचून हत्या

अकोल्यात एकाची दगडाने ठेचून हत्या

अकोला : शहरातील नेहरु पार्क परिसरात अज्ञातांनी एकाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नेहरु पार्क चौकात एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. याबाबतची माहिती मिळताच खदान पोलिसांनी घटनास्थळ गाठले. यावेळी ओळख पटवली असता, खून झालेल्या व्यक्तीचे नाव श्याम शंकर घोडे असल्याची माहिती समोर आली. श्याम घोडे हे गवंडीकाम करणारे असून, खदान परिसरातील शासकीय गोदामामागच्या भागातील रहिवासी आहेत. शनिवारी सकाळी त्यांचा मृतदेह दगडाने ठेचलेल्या अवस्थेत आढळून आला. यावेळी घटनास्थळावर दोन चिलीम आणि रक्ताने माखलेला दगड आढळून आला. व्यसनाधिनतेतून शुक्रवारी मध्यरात्री त्यांची हत्या झाल्याचा अंदाज आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.

Web Title: One was stoned to death in Akola