शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात एक हजारावर मोबाइल मिसिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 12:16 IST

अकोला: जिल्ह्यात मोबाइल चोरट्यांनी चोरलेल्या तसेच खिशातून गहाळ झालेल्या, वाहनातून पळविलेल्या मोबाइल मिसिंगच्या तब्बल एक हजारावर तक्रारी झालेल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

- सचिन राऊत

अकोला: जिल्ह्यात मोबाइल चोरट्यांनी चोरलेल्या तसेच खिशातून गहाळ झालेल्या, वाहनातून पळविलेल्या मोबाइल मिसिंगच्या तब्बल एक हजारावर तक्रारी झालेल्या असल्याची माहिती समोर आली आहे. यामधील ६०० पेक्षा अधिक मोबाइल शोधण्यात सायबर सेलला यश आले असून, सदर मोबाइल कोणत्या ग्राहकांकडे आहे, त्याचा वापर कुठे होतेय, ही इत्थंभूत माहिती सायबर सेलने पोलीस ठाण्यांकडे पाठविली आहे.राजराजेश्वर पालखी कावड महोत्सव, श्रीरामनवमी शोभायात्रा, गणेशोत्सव मिरवणूक, दुर्गादेवी मिरवणूक, ईद, धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी, दिवाळी खरेदीसाठी झालेल्या गर्दीत अनेकांचे मोबाइल चोरी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. तर काहींच्या खिशातूनही मोबाइल गहाळ झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. मोबाइल गहाळ किंवा चोरी झाल्यानंतर देशविघातक कृत्य किंवा गैरकायदेशीर कामांसाठी मोबाइलचा किंवा सीमकार्डचा वापर होऊ नये यासाठी पोलीस ठाण्यात तक्रारी देण्यात आल्या असून, जिल्ह्यात तब्बल एक हजारावर मोबाइल चोरी तसेच गहाळ झाल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. यापैकी ६०० च्यावर मोबाइलचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी या मोबाइलचा शोध घेऊन मोबाइल वापरणाºयाच्या नाव, गाव, पत्त्यासह माहिती संबंधित पोलीस ठाण्यांना देण्यात आली आहे. सायबर सेलकडून दिवसाआड मोबाइल शोधण्यात येत असले तरीही पोलीस ठाण्याच्या स्तरावरून संबंधित ग्राहक ांना मात्र त्यांचे मोबाइल परत देण्याचे प्रमाण कमी असल्याची खात्रीलायक माहिती आहे. मोबाइल परत देण्यास तांत्रिक अडचणीचोरीस गेलेला किंवा गहाळ झालेला मोबाइलचा शोध लागल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्यांकडे ते देण्यात येतात. यासाठी पोलीस ठाण्यांच्या स्तरावरून मोबाइल परत देण्यात येतात; मात्र हे प्रमाण अत्यंत नगण्य असल्याची माहिती आहे. आयएमईआय क्रमांक बदलण्यात येत असल्यामुळेही पोलिसांना मोबाइल परत देताना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे मोबाइल परत देण्याचे प्रमाण कमी असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

 मिसिंग किंवा चोरीस गेलेल्या मोबाइलची तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्याचा तांत्रिक मुद्यांद्वारे तातडीने तपास करण्यात येतो. सदरचा मोबाइल कोणत्या परिसरात सुरू आहे. कोणत्या व्यक्तीकडे आहे, याचा शोध तातडीने घेण्यात येतो. त्यामुळे अनेकांना त्यांचा चोरीस गेलेला मोबाइल परत देण्यात आला आहे. सायबर सेलकडून कोणतीही दिरंगाई न करता मोबाइल शोधण्याचे कामकाज करण्यात येत आहे.- सीमा दाताळकरप्रमुख, सायबर सेल

 

टॅग्स :AkolaअकोलाMissingबेपत्ता होणंMobileमोबाइलCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस