एकाला पोलिस कोठडी, तर दुसर्याची कारागृहात रवानगी
By Admin | Updated: October 3, 2014 01:25 IST2014-10-03T01:25:59+5:302014-10-03T01:25:59+5:30
अकोला येथील पिस्तूल हस्तगत प्रकरण.

एकाला पोलिस कोठडी, तर दुसर्याची कारागृहात रवानगी
अकोला : पिस्तूल हस्तगत प्रकरणामध्ये बुधवारी अटक केलेले राहुल सुधाकर इंगळे व आनंद नंदकुमार देशमुख यांना गुरुवारी दुपारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने राहुल इंगळे याला ३ ऑक्टोबरपर्यंंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिला, तर आनंद देशमुख याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
सोमवारी चिवचिव बाजारातील घरामध्ये देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी चिवचिव बाजारातील घरामध्ये झडती घेतली. झडतीदरम्यान पोलिसांनी राहुल सुधाकर इंगळे (२५) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस् तूल व जिवंत काडतूस जप्त केले. चौकशीदरम्यान त्याने मलकापूर येथे राहणारा आनंद देशमुख (२५) यालासुद्धा एक पिस्तूल २३ हजार रुपयांमध्ये विकल्याची माहिती दिली.
या माहितीच्या आधारावरून पोलिसांनी आनंद देशमुख याच्या घरी छापा मारून त्याला अटक केली होती. कोठडीदरम्यान स्थानिक गुन्हे शाखा पोलिस आरोपी राहुलची चौकशी करणार असून, त्याच्या चौकशीतून आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता आहे.