शहरात एक जण काेरानाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:13 IST2021-07-03T04:13:40+5:302021-07-03T04:13:40+5:30
५३७ जणांनी केली काेराेना चाचणी अकाेला: शहराच्या विविध भागांत काेराेनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असला, तरी काही दिवसांपासून काेराेनाबाधित रुग्णांची ...

शहरात एक जण काेरानाबाधित
५३७ जणांनी केली काेराेना चाचणी
अकाेला: शहराच्या विविध भागांत काेराेनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असला, तरी काही दिवसांपासून काेराेनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. दरम्यान, काेराेनाची लक्षणे आढळून येणाऱ्या ५३७ जणांनी शुक्रवारी चाचणी केली. यामध्ये २५ जणांनी आरटीपीसीआर व ५१२ जणांनी रॅपिड अँटिजन चाचणी केली. संबंधितांचे अहवाल चाचणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाठविण्यात आले आहेत.
हाॅस्पिटलचे अनधिकृत बांधकाम पाडले!
अकोला : उत्तर झोनअंतर्गत अकोटफैल येथील एफ.सी.आय. गोडाउनजवळ डॉ.तारीक फैज यांनी महानगरपालिकेची पूर्वपरवानगी न घेता, जवळपास ५०० चौरस मीटरच्या हॉस्पिटलच्या अनधिकृत बांधकामास सुरुवात केली होती. त्यांना मनपाने नाेटीस दिल्यानंतरही त्यांनी बांधकामाबाबतचे कोणतीही कागदपत्रे सादर केली नाहीत. त्या अनुषंगाने शुक्रवारी मनपाने हाॅस्पिटलचे अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई केली.
वारकऱ्यांना कायद्याची सक्ती करू नका!
अकोला: महाराष्ट्रातील भाविकांचे आराध्य दैवत विठ्ठल-रुक्माई यांच्या दर्शनासाठी परवानगी देण्याची मागणी जिल्ह्यातील वारकरी संप्रदायातून केली जात आहे. २० जुलै राेजी आषाढी एकादशी असून, त्या निमित्ताने काेराेना नियमांचे पालन करून वारीसाठी परवानगी देण्यात यावी, तसेच पंढरपुरात पाेहाेचणाऱ्या वारकऱ्यांना कायद्याची सक्ती करू नका, अशी मागणी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीने केली आहे.
हनुमान चालिसा पठणाचा समाराेप
अकोला: श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने शहरातील मिनी बायपासलगतच्या प्रसिद्ध सालासर बालाजी मंदिर परिसरात २७ मार्च ते २८ एप्रिल ते हनुमान जयंतीपर्यंत रामनवमीच्या पर्वावर १३ कोटी ६५ लाख हनुमान चालिसा पठणाचे आयाेजन केले हाेते. यामध्ये शहरातील असंख्य भक्तांनी सहभाग घेतला हाेता. त्याचा समाराेप करण्यात आला असून, यानिमित्त महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
भाजपतर्फे डॉक्टरांचा सन्मान
अकोला: कोरोना काळात डॉक्टरांनी रुग्णसेवेसाठी दिलेले योगदान माेलाचे आहे. डाॅक्टर डेचे औचित्य साधून भाजपने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजकुमार चव्हाण, हृदयरोग तज्ज्ञ डॉ.दीपक मोरे, डॉ.सागर थोटे, डॉ.आशिष चापे, डॉ.स्वप्निल काकड, डॉ.नितिन गायकवाड, डॉ.मोनिका गायकवाड, डॉ.सुधीर मेन, डॉ.सुनिल थावरानी यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान केला.