एक लाख क्विंटल तूर मोजमापाविना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2017 01:36 IST2017-04-25T01:36:12+5:302017-04-25T01:36:12+5:30
अकोला : हमी दराने ‘नाफेड’द्वारे तूर खरेदी २२ एप्रिलपासून बंद करण्यात आली असली, तरी गत दीड महिन्यांपासून जिल्ह्यातील पाच खरेदी केंद्रांवर २ लाख ५८ हजार क्विंटल तूर मोजमापाविना पडून आहे.

एक लाख क्विंटल तूर मोजमापाविना!
तूर खरेदी बंद : तूर उत्पादक शेतकरी हवालदिल
अकोला : हमी दराने ‘नाफेड’द्वारे तूर खरेदी २२ एप्रिलपासून बंद करण्यात आली असली, तरी गत दीड महिन्यांपासून जिल्ह्यातील पाच खरेदी केंद्रांवर २ लाख ५८ हजार क्विंटल तूर मोजमापाविना पडून आहे. नाफेडद्वारे तूर खरेदी बंद करण्यात आली आणि बाजारात तुरीला योग्य भाव मिळत नसल्याने, तूर उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत प्रतिक्विंटल ५ हजार ५० रुपये हमीदराने नाफेडमार्फत तूर खरेदी करण्यात येत होती. जिल्ह्यात अकोला, बाळापूर व पातूर या तीन तालुक्यांसाठी अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती या एका खरेदी केंद्रावर आणि अकोट, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी व तेल्हारा या चार ठिकाणी खरेदी केंद्रांवर नाफेडद्वारे तूर खरेदी करण्यात येत होती. खरेदी केंद्रांवर तुरीची आवक मोठ्या प्रमाणात होत असताना, तूर खरेदीची प्रक्रिया मात्र संथ गतीने सुरू होती. बारदान्याचा अभाव आणि कर्मचाऱ्यांची तोकडी संख्या असल्याने, दीड महिना उलटूनही तुरीच्या मोजमापासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागली. तुरीच्या मोजमापासाठी शेतकरी प्रतीक्षेत असतानाच, शनिवार, २२ एप्रिल रोजी सायंकाळपासून नाफेडद्वारे तूर खरेदी बंद करण्यात आली. नाफेडद्वारे तूर खरेदी बंद करण्यात आल्याने जिल्ह्यातील पाचही तूर खरेदी केंद्रांवर मोजमापाच्या प्रतीक्षेत तुरीचे ट्रॅक्टर उभे आहेत. २२ एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील पाच खरेदी केंद्रांवर नाफेडद्वारे २ लाख ५८ हजार ६७१ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली असून, तूर खरेदी बंद करण्यात आल्यानंतर खरेदी केंद्रांवर १ लाख ५ हजार २५0 क्विंटल तूर मोजमापाविना पडून आहे. नाफेडद्वारे खरेदी बंद करण्यात आली असून, बाजारात व्यापाऱ्यांकडून तुरीला योग्य भाव मिळत नसल्याने, तूर कुठे विकणार, या चिंतेत शेतकरी हवालदिल झाला आहे.