One lakh 12 thousand consumers did not pay any electricity bill after April | एक लाख १२ हजार ग्राहकांनी भरले नाही एप्रिल नंतर एकही वीज बिल
एक लाख १२ हजार ग्राहकांनी भरले नाही एप्रिल नंतर एकही वीज बिल

अकोला: महावितरणच्याअकोला परिमंडळातील थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. परिमंडळातील १ लाख ११ हजार ९९५ ग्राहकांनी एप्रिल महिन्यानंतर एकही वीजेचे बिल भरले नसल्याने त्यांच्याकडे वीज बिला पोटी ५२ कोटी ४९ लाख ६ हजार २०२ रुपये थकले आहे . थकबाकी वाढविणाº्या या ग्राहकांवर कारवाई करण्यासाठी व नियमीत देयकांचा भरणा करणाऱ्या ग्राहकांना अखंडित सेवा देण्यासाठी महावितरणने मोहिम आखली आहे.
या मोहिमेत परिमंडळ कार्यालयांकडून प्रत्येक विभागाला उपविभागनिहाय कारवाई करण्याचे टार्गेट देण्यात आले आहे. शिवाय या ग्राहकांकडे असलेल्या थकबाकीचा फटका ग्राहक सुविधेला बसत आहे . कारण महावितरणच्या कर्मचाऱ्यांना वसूलीसाठी जावे लागत असल्याने वीज यंत्रणेची देखभाल दुरूस्ती करणे , नविन वीज जोडणी देणे , ग्राहकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करणे महावितरण कर्मचा?्यांना शक्य होत नसल्याने वीज देयके थकविणाºया आणि पयार्याने ग्राहकसुविधेला अडथळा ठरणाºया अशा ग्राहकांचा वीजपुरवठा या मोहीमेत खंडित करण्यात येणार आहे.
एप्रिल महिन्यानंतर एकही वीज बिल न भरणाºया ग्राहकांमध्ये घरगुती , वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांचा समावेश असून यामध्ये अकोला जिल्हयातील ३४ हजार ५०० ग्राहक आहेत. त्यांच्याकडे वीज बिलापोटी १७ कोटी ९९ लाख ३२ हजार २७७ रूपयाची थकबाकी आहे. बुलढाणा जिल्हयातील ५३ हजार ९४७ ग्राहकांचा या थकबाकीदारात समावेश असून त्यांनी २३ कोटी २१ लाख ४७ हजार ७५७ रुपए थकविले आहे , तर वाशिम जिल्हयातील २३ हजार ४६७ ग्राहकांनी एप्रिल नंतर एकही बिल न भरल्याने त्यांच्याकडे वीज देयकापोटी ११ कोटी २८ लाख ३० हजार १६७ रुपए थकीत आहे.
महावितरणच्या कारवाईत थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याबरोबर संशयीत ग्राहकांचे वीज मिटर तपासण्यात येणार असून,ग्राहक वीज चोरी करत असल्याचे आढल्यास विद्युत कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

एकही वीज बिल न भरणारे विभाग निहाय ग्राहक व थकबाकी
विभाग ग्राहक थकबाकी
1. अकोला ग्रामीण १५९७४ ६६४,३७३६१
2. अकोला शहर ७४८६ ५२९,७०६८५
3. अकोट १११२१ ६,०५,२४२२९
-------------------------------------------------------------------------
अकोला जिल्हा ३४५८१ १७ ९९,३२२७७
-----------------------------------------------------------------------
1. बुलढाणा २०८४१ ९४८,९८१९१
2. खामगाव २१८३९ ९५७,६७९६३
3. मलकापुर ११२६७ ४,१४,७७६०२
--------------------------------------------------------------------------
बुलढाणा जिल्हा ५३९४७ २३,२१,४७७५७
--------------------------------------------------------------------------
वाशिम जिल्हा २३४६७ ११,२८,३०१६७
-------------------------------------------------------------------------

Web Title: One lakh 12 thousand consumers did not pay any electricity bill after April

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.