व्यापा-याला मागितली एक लाखाची खंडणी

By Admin | Updated: December 26, 2014 01:24 IST2014-12-26T01:24:33+5:302014-12-26T01:24:33+5:30

अकोल्यातील प्रकार; दोघा आरोपींवर गुन्हा दाखल.

One lacquer ration sought for businessman | व्यापा-याला मागितली एक लाखाची खंडणी

व्यापा-याला मागितली एक लाखाची खंडणी

अकोला: शहरातील व्यापार्‍याला एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुरुवारी रात्री ९.३0 वाजताच्या सुमारास दोघा आरोपींवर गुन्हा दाखल केला.
आळशी प्लॉटमध्ये राहणारे व्यापारी सुनील सोहनलाल अजमेरा (४९) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते गुरुवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घरी जात होते. त्यावेळी आरोपी महेंद्र रिकबचंद्र जैन व अनोळखी इसमाने त्यांना राजपूतपुरा परिसरात अडविले आणि आज रात्रीपर्यंत एक लाख दिले नाहीस, तर उद्या तुझ्याविरुद्ध माझ्या पत्नीची छेडखानी व बलात्कार केल्याची पोलीस ठाण्यात तक्रार देईल, अशी धमकी दिली. अजमेरा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी महेंद्र जैन व अनोळखी इसमाविरूद्ध भादंवि कलम ३८५ नुसार गुन्हा दाखल केला.

Web Title: One lacquer ration sought for businessman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.