ट्रॅक्टर अपघातात एक ठार

By Admin | Updated: June 1, 2016 01:19 IST2016-06-01T01:19:04+5:302016-06-01T01:19:04+5:30

तेल्हारा तालुक्यातील घटना.

One killed in tractor crash | ट्रॅक्टर अपघातात एक ठार

ट्रॅक्टर अपघातात एक ठार

हिवरखेड (जि. अकोला)- हिवरखेड-चिचारी रस्त्यावर ट्रॅक्टर उलटून एकजण जागीच ठार झाल्याची घटना ३१ मे रोजी घडली.
या घटनेत गुलाब तुकड्या सुरतने (५२) व ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३0 पी ५९0५ चा चालक देवीलाल नामदेव काकडे रा. राहणापूर हे दोघे शहापूर (आकोट) येथून बोरव्हा येथे नातेवाइकाकडे आले होते. बोरव्हा ते चिचारी मार्गे हिवरखेडकडे येत असताना शेख वकील शेख बादू यांच्या शेताजवळ ट्रॅक्टरचे समोरील चाक पंर झाले. यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर बाजूच्या नाल्याच्या दिशेने उलटला. ट्रॅक्टरमध्ये बसलेले गुलाब सुरतने हे ट्रॅक्टरखाली दबल्याने जागीच मरण पावले. किसन रसुल मोरे यांच्या तक्रारीवरून हिवरखेड पोलिसांनी चालक देवीलाल काकडे याच्याविरुद्ध २७९, ३0४ अ नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळाला ठाणेदार सुधाकर देशमुख यांनी भेट दिली.

Web Title: One killed in tractor crash