मोटारसायकल अपघातात एक ठार; एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 20:35 IST2017-08-08T20:32:54+5:302017-08-08T20:35:16+5:30
खेट्री : नजीकच्या चतारी खेट्री मार्गावर मोटारसायकलच्या अपघातात दोन जण गंभीर झाल्याची घटना ८ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.

मोटारसायकल अपघातात एक ठार; एक गंभीर
लोकमत न्यूज नेटवर्क
खेट्री : नजीकच्या चतारी खेट्री मार्गावर मोटारसायकलच्या अपघातात दोन जण गंभीर झाल्याची घटना ८ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.
पातूर तालुक्यातील मळसूर येथील रहिवासी बबन कंकाळ (५६) व शेख अयाज (४0) हे दोघे ३0 एएक्स १४८९ या क्रमांकाच्या मोटारसायकलने मंगळवारी मळसूर येथून खेट्रीकडे काही कामानिमित्ताने येत होते. यावेळी चतारी-खेट्री मार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटारसायकल फरपटत जाऊन कॅनॉलमध्ये पडली. या घटनेमध्ये दोघे गंभीर झाले. त्यांच्यावर चतारी येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर अँम्ब्युलन्सने अकोल्याला नेण्यात येत होते. दरम्यान, चतारीपासून पाच किलोमीटर अंतरावर सस्ती गावाजवळ रस्त्यातच बबन कंकाळ (५६) यांचा मृत्यू झाला आहे. यातील अन्य जखमी शेख अयाज यांना अकोला येथे सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. हे वृत्त लिहीपर्यंत चान्नी पोलिसांत कुठल्याही प्रकारची फिर्याद देण्यात आली नव्हती.