ट्रक-दुचाकीच्या भीषण अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:23 IST2021-08-24T04:23:26+5:302021-08-24T04:23:26+5:30
आकाेट फेलातील रहिवासी राहुल उज्जेनवाल व त्यांचा मित्र मंगेश भमन हे दाेघे त्यांच्या दुचाकीने अकाेल्याकडून दर्यापूरकडे जात असताना त्यांच्या ...

ट्रक-दुचाकीच्या भीषण अपघातात एक ठार
आकाेट फेलातील रहिवासी राहुल उज्जेनवाल व त्यांचा मित्र मंगेश भमन हे दाेघे त्यांच्या दुचाकीने अकाेल्याकडून दर्यापूरकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला समाेरून येणाऱ्या आयशर ट्रकने बंधुगाेटा फाट्यानजीक जबर धडक दिली. या अपघातात राहुल उज्जेनवाल यांचा जागेवरच मृत्यू झाला, तर त्यांचा मित्र मंगेश भमन हा या अपघातात गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने या युवकास नागपूर येथे हलविण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच आकाेट फैल पाेलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून जखमींना उपचारासाठी पाठविले़, तर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वाेपचार रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी आकाेट फैल पाेलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.