कंटेनरच्या धडकेत एक ठार; तीन जखमी
By Admin | Updated: June 25, 2014 00:02 IST2014-06-24T23:08:37+5:302014-06-25T00:02:09+5:30
अकोलावरुन जालना जाणार्या चारचाकी गाडीला कंटेनरने जबर धडक दिल्याने वाहनचालक जागीच ठार.

कंटेनरच्या धडकेत एक ठार; तीन जखमी
डोणगाव : अकोलावरुन जालना जाणार्या स्वीफ्ट डिझायर या चारचाकी गाडीला समोरुन येणार्या कंटेनरने जबर धडक दिली. त्यामध्ये वाहनचालक जागीच ठार झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना २४ जून रोजी सकाळी ६ वाजता डोणगाव रस्त्यावरील शिंदे कॉलेजजवळ घडली.
अकोला येथील अरशद अय्युब अहमद, अन्सार अहमद, शे.अय्युब व शे.अफसर व बडनेरा येथील शे.अफसर हुसेन, अ.करीम कुरेशी हे स्वीफ्ट डिझायर क्र.एम.एच.३0 - ४३१३ ने जालना येथे जात होते; दरम्यान डोणगाव रस्त्यावरील डॉक्टर शिंदे कॉलेजजवळ समोरुन येणार्या एम.एच.0४ सी.ए.४३१0 क्रमांकाच्या कंटेनरने त्यांच्या चारचाकीला गाडीला जबर धडक दिली. त्यामध्ये स्वीफ्ट डिझायर चालक जाकीरखान शफीउल्ला खान हा जागीच ठार झाला. तर अन्सार अहमद, अरशद अय्युब व अफसर हुसेन हे जखमी झाले. जखमींना तत्काळ मेहकर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी कंटेनरचालक बाबासाहेब बाबूराव आव्हाड रा.जांबळी, ता.पाथर्डी, जि.अहमदनगर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.