दुचाकीच्या अपघातात एक ठार

By Admin | Updated: November 1, 2016 02:08 IST2016-11-01T02:08:24+5:302016-11-01T02:08:24+5:30

दिवाळीच्या रात्री अकोट फैलमधील घटना.

One killed in a bike accident | दुचाकीच्या अपघातात एक ठार

दुचाकीच्या अपघातात एक ठार

अकोला, दि. ३१-दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने एक ठार, तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना दिवाळीच्या दिवशी रात्री आठ वाजता घडली. हा अपघात अकोट फैलमधील मायक्रो टॉवरनजीक घडला होता.
उगवा येथील रहिवासी रवींद्र भास्कर बोदडे हे त्यांच्या दुचाकीने जात असताना सिंधी येथील रहिवासी रोहित रमेश बोने याच्या दुचाकीसोबत समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही दुचाकी चालक गंभीर जखमी झाले. त्यांना परिसरातील नागरिकांनी तातडीने उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. मात्र, दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नातेवाईकांनी खासगी रुग्णालयात हलविले. काही वेळातच रोहित बोने यांचा उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला, तर रवींद्र बोदडे यांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अकोट फैल पोलीस स्टेशनचे कर्मचारी शेर अली यांनी तक्रार दाखल केली आहे.

Web Title: One killed in a bike accident