दुचाकींच्या अपघातात एक ठार
By Admin | Updated: November 24, 2015 01:50 IST2015-11-24T01:50:04+5:302015-11-24T01:50:04+5:30
अपघतातात विझोरा येथील ३५ वर्षीय इसमाचा मृत्यू.

दुचाकींच्या अपघातात एक ठार
अकोला - कुंभारीनजीक दोन भरधाव दुचाकींमध्ये रविवारी रात्री अपघात झाला. या अपघतातात विझोरा येथील ३५ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. विझोरा येथील टेलरकाम करणारे लक्ष्मण गेंदासिह राठोड हे औद्योगिक वसाहतीतील काम आटोपून रात्री घरी परत जात असताना त्यांच्या दुचाकीला समोरून आलेल्या अज्ञात दुचाकीस्वाराने जबर धडक दिली. या अपघातात लक्ष्मण राठोड यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात एक जण जखमी झाल्याची माहिती आहे; मात्र सदर जखमी खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याने या अपघातातील दुसर्या दुचाकीस्वाराचा शोध लागला नाही. याप्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एमआयडीसी परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाहतुकीला शिस्त नसल्याने अपघात घडत असून अनेकांना त्यामुळे अपंगत्त्व आले आहे.