ट्रकचालकांच्या सशस्त्र हाणामारीत एक ठार
By Admin | Updated: February 23, 2015 00:25 IST2015-02-23T00:25:53+5:302015-02-23T00:25:53+5:30
क्षुल्लक कारणावरून घडली मेहकर-चिखली रस्त्यावर घटना.

ट्रकचालकांच्या सशस्त्र हाणामारीत एक ठार
साखरखेर्डा (जि. बुलडाणा): मेहकर ते चिखली रोडवर गजरखेड-शिवाजी नगर फाट्याच्या मधोमध दोन ट्रकचालकांची फ्रीस्टाईल मारामारी होऊन एकाने धारदार शस्त्राने वार करून दुसर्यास ठार मारल्याची घटना २२ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १ वाजता घडली.
मध्यप्रदेशमधील एक ट्रक आलू (बटाटा) घेऊन परभणी येथे आला. २१ फेब्रुवारीला मार्केटमध्ये ट्रक खाली करून गंगाखेड येथून देवासकरिता साखर भरून ट्रक सी.जी.-0४- डी.ए.२३९४ हा मेहकर-चिखली रोडने जात होता. रात्रीच्या वेळी चिखली-मेहकर रोडने ए.पी.- २१-डब्ल्यू ३१२0 हा ट्रक जात होता. काही कारण नसताना ३१२0 च्या ट्रकचालकाने डीए २३९४ च्या ट्रकवर पाण्याची बाटली फेकून मारली. त्यात ट्रकचा समोरील काच फोडला. या तच दोन्ही ट्रकचालकात मारामारीस सुरुवात झाली. तब्बल १२.३0 ते १ वाजेपर्यंत रस्त्यातच तुफान हाणामारी होत असताना ट्रॉफिक रात्री जाम झाली होती. ए.पी.२१-डब्ल्यू.३१२0 च्या चालकाने देवेंद्रसिंग बल्लूसिंग याच्या हातावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले होते. जखमी देवेंद्रसिंगला रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. देवेंद्रसिंग हा मध्यप्रदेशातील बालना या गावचा रहिवासी आहे. त्याच ट्रकवरील दीपकसिंग भगवानसिंग तोमर यांच्या तक्रारीवरून साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार नीलेश ब्राह्मणे यांनी कलम ३0२ प्रमाणे आरोपी ए. पी.२१-डब्ल्यू ३१२0 च्या चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पीएसआय प्रदीप शेलार करीत आहेत. सदर घटनेतील आरोपी पांडे रा. चंद्रपूर यास पोलिसांनी मालेगाव येथे अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.