शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

अकोला जिल्हय़ात वेगवेगळय़ा तीन अपघातात एक ठार, चार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 8:10 PM

अकोला :  जिल्ह्यात १७ फेब्रुवारी रोजी तीन वेगवेगळ्य़ा अपघातात एक ठार तर चार जखमी झाले. म्हातोडी ते कासली रस्त्यावर भरधाव ट्रकने दुचाकीस धडक दिल्याने एक जण ठार झाला. देवरी-बळेगाव फाट्यादरम्यान दुचाकी अपघातात एक गंभीर जखमी झाला तर बाळापूर शहराजवळील वळणावर दुचाकी अपघातात दोघे जखमी झाले. कैलास प्रभाकर पाकदुणे असे मृताचे नाव आहे.

ठळक मुद्देम्हातोडी-कासली रस्त्यावर दुचाकीस ट्रकची धडकदेवरी फाटा व बाळापूरजवळ दुचाकी अपघातकैलास प्रभाकर पाकदुणे असे मृताचे नाव आहेसंतप्त ग्रामस्थांनी फोडल्या ट्रकच्या काचा 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला :  जिल्ह्यात १७ फेब्रुवारी रोजी तीन वेगवेगळ्य़ा अपघातात एक ठार तर चार जखमी झाले. म्हातोडी ते कासली रस्त्यावर भरधाव ट्रकने दुचाकीस धडक दिल्याने एक जण ठार झाला. देवरी-बळेगाव फाट्यादरम्यान दुचाकी अपघातात एक गंभीर जखमी झाला तर बाळापूर शहराजवळील वळणावर दुचाकी अपघातात दोघे जखमी झाले. कैलास प्रभाकर पाकदुणे असे मृताचे नाव आहे.दोनवाडा येथील कैलास पाकदुणे (२२)व पवन विनायक झटाले हे दुचाकी क्र.एमएच ३0 एके ७६७0 ने शनिवारी अकोल्याकडे येत होते. दरम्यान, याच रस्त्याने अकोल्याकडे येत असलेल्या ट्रक क्र.एमएच ३0 बीडी 0८२१ ने त्यांच्या दुचाकीस जबर धडक दिली. ट्रकच्या धडकेने दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी ट्रकच्या समोरच्या चाकाखाली सापडली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळावर धाव घेऊन दोन्ही जखमींना अकोला येथे खासगी रुग्णालयात दाखल केले. खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान कैलास पाकदुणे यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अकोट फैल पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले होते. 

संतप्त ग्रामस्थांनी फोडल्या ट्रकच्या काचा या अपघातात गंभीर जखमी झालेल्या कैलास पाकदुणे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती ग्रामस्थांना मिळताच त्यांनी अपघातग्रस्त ट्रकच्या काचा फोडल्या. ग्रामस्थ संतप्त झाल्याने घटनास्थळावर तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच अकोल्याचे एसडीपीओ माने, रामदासपेठ पोलीस स्टेशनचे सपकाळ, वाहतूक शाखेचे ठणेदार विलास पाटील, आरसीपीच्या पथकाने घटनास्थळावर धाव घेतली. यावेळी दोनवाडा येथील सरपंच श्रीकृष्ण झटाले, कासलीचे सरपंच बाबूराव इंगळे, पं.स.सदस्य रामचंद्र घावट यांनी ग्रामस्थांना शांतता राखण्याचे आवाहन केले. 

खड्डय़ांमुळे दुचाकी अपघात; एक गंभीर१७ फेब्रुवारीला दुपारी ३ ते ४ वाजताच्या दरम्यान अकोलावरून अकोटकडे शिक्षक पतसंस्था अकोटचे कर्मचारी मुकुंद मुरलीधर मोरे (४८) रा. अकोट हे दुचाकी क्र. एमएच ३0 एक्यू. ९८५६ ने जात होते. देवरी-बळेगाव फाट्याच्या मध्ये असलेल्या खड्डय़ांमुळे दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये मुकुंद मोरे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने अकोला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या मार्गावर असलेल्या खड्डय़ांमुळे आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे, खड्डे बुजवण्याची मागणी होत आहे. 

टॅग्स :AccidentअपघातAkola Ruralअकोला ग्रामीणDeathमृत्यू