रेल्वेखाली चिरडून एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 16:28 IST2021-03-14T16:26:26+5:302021-03-14T16:28:29+5:30
One killed after being crushed under a train रेल्वेखाली आल्याने एका इसमाचा चिरडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.

रेल्वेखाली चिरडून एकाचा मृत्यू
ठळक मुद्दे गणेश तोताराम गावंडे, रा. मारुती नगर असे त्यांची ओळख पटली. डाबकी रोड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
अकोला : रेल्वेखाली आल्याने एका इसमाचा चिरडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी डाबकी रोड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
डाबकी रोडवरील मारोती नगर येथील रहिवासी गणेश तोताराम गावंडे (वय ५० वर्ष) यांचा मृतदेह रेल्वे मार्गाच्या बाजूला पडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यानंतर शोध घेतला असता गणेश तोताराम गावंडे, रा. मारुती नगर असे त्यांची ओळख पटली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविला. मृत्यूचे नेमके कारण अद्यापसमोर आले नाही.