वाड्याचा दरवाजा एक, शेतीलाही नाही धुरा!

By Admin | Updated: May 15, 2015 01:14 IST2015-05-15T00:52:25+5:302015-05-15T01:14:53+5:30

आंतरराष्ट्रीय एकत्र कुटुंब दिवस; खामगावात नांदते ३५ जणांचे एकत्र कुटुंब.

One door of the castle, no spindle in the field! | वाड्याचा दरवाजा एक, शेतीलाही नाही धुरा!

वाड्याचा दरवाजा एक, शेतीलाही नाही धुरा!

गिरीश राऊत / खामगाव : काळ बदलला तसे नातेही बदलल्याचे चित्र आताच्या परिस्थितीत दिसून येते; मात्र असे असतानाही काही कुटुंबांनी एकत्र नांदण्याचा आदर्श टिकवून ठेवला आहे. मानपान, रुसवे-फुगवे तर सर्वच कुटुंबात असतात; परंतु एकत्र कुटुंबाचे फायदेच अधिक असल्याने अशा रुसव्या-फुगव्याचे आयुष्य फार थोडे असते. खामगाव शहरातील जुनी वस्ती म्हणून ओळख असलेल्या सुटाळपुरा भागातही असे एक एकत्र कुटुंब सुखनैव संसार करीत आहे. या कुटुंबाचे वास्तव्य असलेल्या वाड्याला एकच दरवाजा असून, ७0 एकर श्ो तीला धुरा नाही. वयाची ८६ वर्षे गाठणारे विश्‍वनाथ दळी हे या कुटुंबाचे प्रमुख आहेत त्यांना ५ मुले व १ मुलगी. मुलांची लग्न झाल्यानंतर हे कुटुंब १२ सदस्यांचे झाले. नातू झाल्यानंतर ही कुटुंब सं ख्या २८ वर पोहोचली; मात्र तरीही कुटुंब विभक्त झाले नाही. या २८ जणांसाठी किराणा एकत्रच व स्वयंपाकसुद्धा एकत्र. घरखर्च हा शेतीतून आलेल्या मिळकतीतून. घराचा व्यवहार विश्‍वनाथ दळी तसेच सर्व मुलांकडे; मात्र कोणाला काही गरज पडली तर त्याने सांगायच्या आधीच ती गरज ओळखून त्याला ती पुरविणे हे कुटुंबाचे वैशिष्ट्य. यामुळे कोणालाही आ पली परवड होत असल्याची जाणीव झाली नाही. शेत, किराणा दुकान, म्हशी यामुळे शक्य तोवर ज्या वस्तू गरजेच्या आहे त्या घरातच असल्याने कोणालाही कशाची भ्रांत पडली नाही. विश्‍वनाथ दळी यांच्या नातवांची लग्ने झाल्यानंतर कुटुंबाचा पुन्हा विस्तार होऊन ही संख्या वाढत जाऊन ३0 तर आज त्यांचे पणतू अशी आता कुटुंबातील सदस्य संख्या ३५ एवढी झाली आहे. कालांतराने परिस्थिती बदलत गेली. धावपळीचे युग सुरू झाले. अशा परिस्थितीत एकत्र स्वयंपाक त्यासाठी लागणारा वेळ व घराबाहेर पडल्याची वेळ. ऐन कामाच्या वेळी मुलांचा आईजवळ राहण्याचा हट्ट, शाळेसाठी त्यांना लागणारा डबा यांचा ताळमेळ बसविण्यासाठी म्हणून आता फक्त चुली वेगळ्या आहेत.

Web Title: One door of the castle, no spindle in the field!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.