नाल्यात पडून एकाचा मृत्यू

By Admin | Updated: April 25, 2017 01:08 IST2017-04-25T01:08:28+5:302017-04-25T01:08:28+5:30

अकोला : मनपातील सफाई कामगाराचा नाल्यात पडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे,

One dies in the nullah | नाल्यात पडून एकाचा मृत्यू

नाल्यात पडून एकाचा मृत्यू

अकोला : मनपातील सफाई कामगाराचा नाल्यात पडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, तर एका वृद्धाचा सर्वोपचार रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अकोट फैलातील संत कबीरनगर येथील रहिवासी श्रावण जगन्नाथ मेहसरे (४५) हे रविवारी रात्री न्यू राधाकीसन प्लॉटमधील नाल्याच्या आवारभिंतीवर झोपले होते. झोपेतच त्यांच्या तोल गेल्याने ते नाल्यात कोसळले.
नाल्यातील पाणी त्यांच्या नाका-तोंडात गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. ते मद्य प्राशन करून होते, असे पोलिसांनी सांगितले. त्यांचे भाऊ शंकर जगन्नाथ मेहसरे (३२) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दुसऱ्या एका घटनेत ६५ वर्षीय वृद्धास उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्या वृद्धाचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पिंजर येथील युवकाची आत्महत्या
पिंजर: येथील १८ वर्षीय शेतमजूर युवकाने बटाईने केलेल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पिंजर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
पिंजर येथील लखन महादेव डोंगरे या युवकाने सोमवारी केदारे यांच्या शेतात असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी पिंजर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोद केली आहे.

Web Title: One dies in the nullah