वारी येथे डोहात बुडून एकाचा मृत्यू
By Admin | Updated: March 28, 2016 01:43 IST2016-03-28T01:43:04+5:302016-03-28T01:43:04+5:30
तेल्हारा तालुक्यातील घटना.

वारी येथे डोहात बुडून एकाचा मृत्यू
हिवरखेड (जि. अकोला): तेल्हारा तालुक्यातील वारी येथील मामा-भाच्याच्या डोहात बुडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. सहदेव नारायण हागे, रा. कोठा असे मृतकाचे नाव आहे. सहदेव हागे हे वारी येथे दर्शनासाठी गेले होते. डोहात अंघोळीसाठी गेले असता, ते खोल पाण्यात बुडाले. ही घटना रविवारी उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.