शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

अपघाती मृत्यू प्रकरणात एक कोटी नुकसान भरपाई देण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 01:53 IST

अपघातात मरण पावलेल्या मृतकाच्या परिवारास महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाने १ कोटी १ लाख ७२ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, असा महत्त्वपूर्ण निकाल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. झेड. ख्वाजा यांच्या न्यायालयाने मंगळवारी दिला. 

ठळक मुद्देजिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अपघातात मरण पावलेल्या मृतकाच्या परिवारास महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाने १ कोटी १ लाख ७२ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, असा महत्त्वपूर्ण निकाल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. झेड. ख्वाजा यांच्या न्यायालयाने मंगळवारी दिला.  बाश्रीटाकळी तालुक्यातील जांभरूण येथील डॉ. संतोष तुकाराम डाखोरे हे चंद्रपूर जिल्हा परिषदेमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. २७ एप्रिल २0१६ रोजी डॉ. डाखोरे ब्रम्हपुरी ते वरोरा एसटी बसने प्रवास करीत होते. चंद्रपूर जिल्हय़ातील भिसी पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या शंकरपूर चिमूर रोडवर एसटी क्रमांक एमएच 0७ सी ७७२७ ने विरुद्ध दिशेने येणार्‍या दुचाकीला धडक दिली. यावेळी एसटी चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे एसटी रस्त्याच्या कडेला उलटली. यामध्ये डॉ. डाखोरे यांचा मृत्यू झाला होता. भिसी पोलिसांनी एसटी चालक संतोष काकपुरे याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३0४ अ नुसार गुन्हा दाखल करून अटक केली. मृतक संतोष डाखोरे यांच्यावतीने एसटी महामंडळावर नुकसान भरपाईचा दावा दाखल करण्यात आला होता. मृतक हा एमबीबीएस उत्तीर्ण व रेडिओलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत होता, तसेच मृतकाला ७0 हजारांपेक्षा जास्त पगार होता. ही बाब दावाकर्त्याच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. या खटल्यात मृतकाची आई सुमन, वडील तुकाराम, भाऊ विष्णू आणि विजय यांना ही रक्कम विभागून देण्यात आली. याप्रकरणी मृतक संतोष डाखोरे यांच्यावतीने अकोल्यातील अँड. एस. एन. वखरे, अँड. नरेंद्र बेलसरे व अँड. दिनेश गढे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :AccidentअपघातCourtन्यायालय