देशी दारूची विक्री करताना एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:19 IST2021-09-13T04:19:09+5:302021-09-13T04:19:09+5:30
खेट्री : पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशनअंतर्गत गावंडगाव येथे देशी दारूची विक्री करताना चान्नी पोलिसांनी एकास रविवारी रंगेहाथ पकडले. ...

देशी दारूची विक्री करताना एकास अटक
खेट्री : पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशनअंतर्गत गावंडगाव येथे देशी दारूची विक्री करताना चान्नी पोलिसांनी एकास रविवारी रंगेहाथ पकडले.
पातूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या गावंडगाव येथे देविदास कांबळे हे घरात देशी दारूची विक्री करीत असल्याची गुप्त माहिती मिळताच चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनात सहायक उपनिरीक्षक आदिनाथ गाठेकर, देशमुख बाप्पू आदींनी रविवारी दि.१२ सप्टेंबर रोजीच्या सायंकाळी सापळा रचून धाड टाकली असता देविदास कांबळे हा देशी दारूची विक्री करीत होता. त्याला अटक करून त्याच्याजवळून १६०० रुपयांचे देशी दारूचे ४० कॉटर जप्त केले असून, पोलीस कर्मचाऱ्यांच्या फिर्यादीवरून चान्नी पोलिसांनी आरोपी देविदास कांबळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून समजपत्रावर त्याची ठाण्यातून सुटका करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक उपनिरीक्षक आदिनाथ गाठेकर करीत आहेत.