धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोल्यात निघाली जल्लोषात मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2023 16:25 IST2023-10-25T16:10:53+5:302023-10-25T16:25:27+5:30
अकोला: धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोला शहरातील रेल्वे स्टेशन येथून भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित मिरवणुकीला वाजत गाजत फटाक्यांच्या आतिषबाजीत ...

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोल्यात निघाली जल्लोषात मिरवणूक
अकोला: धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोला शहरातील रेल्वे स्टेशन येथून भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित मिरवणुकीला वाजत गाजत फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोषात सुरुवात झाली.
या मिरवणुकीतील जिल्हाभरातून खाडे व्यायाम शाळा सह विविध सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला होता. निवडणुकीमध्ये आखाड्याच्या कार्यकर्त्यांनी लेझीमपथक, दांडपट्टा मल्लयुद्ध तलवारबाजी कलांचे प्रदर्शन केले. मिरवणुकीमध्ये समता बौद्ध विहार सिद्धार्थ आखाडा यांनी मिरवणुकीत अनेक पित्त थरारक प्रात्यक्षिके सादर केली. तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने व शिवाजी महाविद्यालयातील माजी माजी विद्यार्थी कृती समिती मिरवणूक आलेल्या आंबेडकरी अनुयायांना भोजनदान दिले.