अल्पवयीन मुलीस पळविणारा वृद्ध जेरबंद

By Admin | Updated: January 19, 2017 02:50 IST2017-01-19T02:50:02+5:302017-01-19T02:50:02+5:30

वृद्धाने नात्यातीलच मुलीस पळविले होते.

Older Martyr | अल्पवयीन मुलीस पळविणारा वृद्ध जेरबंद

अल्पवयीन मुलीस पळविणारा वृद्ध जेरबंद

अकोला, दि. १८- मुकुंदवाडी येथील रहिवासी १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस पळविणार्‍या मिलिंद नगर येथील रहिवासी एका ५६ वर्षीय वृद्धास डाबकी रोड पोलिसांनी बुधवारी अटक केली. सदर वृद्धाने नात्यातीलच मुलीस पळविल्याची माहिती असून, हा वृद्ध मुलीचा मामा किंवा मावसा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मुकुंदवाडी येथील रहिवासी असलेली १६ वर्षीय मुलगी रविवारी सायंकाळपासून बेपत्ता असल्याचे तिच्या आई-वडिलांच्या निदर्शनास आले. त्यांनी मुलीचा शोध घेतला असता, ती मिळून आली नाही. त्यानंतर त्यांनी नातेवाइकांसह मित्रांकडे चौकशी केली असता, या अल्पवयीन मुलीला तिच्याच नात्यात असलेल्या आणि मिलिंद नगर येथील रहिवासी भीमराव धर्माजी खंडारे (५६) याने रविवारी फूस लावून पळविल्याचे समोर आले. मुलगी रविवारी रात्री घरी न आल्याने तिच्या आई-वडिलांनी शोध घेतल्यानंतर हा प्रकार समोर आला. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी डाबकी रोड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. यावरून डाबकी रोड पोलिसांनी खंडारे याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३६३ आणि ३६६ नुसार गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला. त्यानंतर बुधवारी आरोपीस अटक करण्यात डाबकी रोड पोलिसांना यश आले.

Web Title: Older Martyr