नदीत बुडून वृद्धाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:29 IST2020-12-05T04:29:55+5:302020-12-05T04:29:55+5:30

मूर्तिजापूर : दुर्गवाडा येथील ८८ वर्षीय वृद्धाचा पूर्णा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना ४ डिसेंबर रोजी उघडकीस आली. वाल्मीक ...

An old man drowned in a river | नदीत बुडून वृद्धाचा मृत्यू

नदीत बुडून वृद्धाचा मृत्यू

मूर्तिजापूर : दुर्गवाडा येथील ८८ वर्षीय वृद्धाचा पूर्णा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना ४ डिसेंबर रोजी उघडकीस आली. वाल्मीक शेषराव नवघरे असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे.

ग्राम दुर्गवाडा येथील रहिवासी वाल्मीक शेषराव नवघरे हे २ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास शेतात जातो, म्हणून घरून निघून गेले होतेे; परंतु तेव्हापासून ते घरी परतले नसल्याने त्यांचा सर्वत्र शोध घेतला असता ते मिळून आले नाही. दरम्यान, आपत्कालीन पथकाने शुक्रवारी मुर्कोजी महाराज मंदिर परिसरातील नदीपात्रात त्यांचा शोध घेतला असता नदीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यांचा मुलगा गजानन वाल्मीक नवघरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद नोंद केली आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सूरज मंगरुळकर करीत आहे.

Web Title: An old man drowned in a river