वृद्धेच्या गळय़ातील मंगळसूत्र लंपास
By Admin | Updated: November 7, 2014 00:54 IST2014-11-07T00:54:48+5:302014-11-07T00:54:48+5:30
अज्ञात चोरट्याने केले गळय़ातील २५ ग्रॅमचे मंगळसूत्र लंपास.

वृद्धेच्या गळय़ातील मंगळसूत्र लंपास
अकोला: एसटी बसमध्ये प्रवास करणार्या वृद्धेच्या गळय़ातील २५ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र लं पास झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. या प्रकरणी गुरुवारी सिव्हिल लाईन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
काँग्रेसनगरात राहणारे विनोद आपोतीकर यांच्या तक्रारीनुसार त्यांची आई बुधवारी दुपारी अकोला-दर्यापूर एस.टी. बसने जात असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळय़ातील २५ ग्रॅमचे मंगळसूत्र लंपास केले. एसटी बस शहराबाहेर गेल्यानंतर या वृद्धेला तिच्या गळय़ातील मंगळसूत्र लंपास झाल्याचे लक्षात आले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला.