ऑफलाइन नकाशा मंजुरीचा चेंडू महापाैरांच्या दालनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:14 IST2021-07-10T04:14:11+5:302021-07-10T04:14:11+5:30

क्रेडाईची धावाधाव; चेंडू महापाैरांकडे! मनपाच्या अचंबित करणाऱ्या भूमिकेमुळे बांधकाम व्यावसायिकांनी क्रेडाई संघटनेकडे गाऱ्हाणे मांडले. त्यामुळे संघटनेने आयुक्तांसाेबत चर्चा करून ...

Offline Map Approval to Mahapaira's Hall | ऑफलाइन नकाशा मंजुरीचा चेंडू महापाैरांच्या दालनात

ऑफलाइन नकाशा मंजुरीचा चेंडू महापाैरांच्या दालनात

क्रेडाईची धावाधाव; चेंडू महापाैरांकडे!

मनपाच्या अचंबित करणाऱ्या भूमिकेमुळे बांधकाम व्यावसायिकांनी क्रेडाई संघटनेकडे गाऱ्हाणे मांडले. त्यामुळे संघटनेने आयुक्तांसाेबत चर्चा करून आता पुन्हा ऑनलाइनद्वारे नकाशा सादर केल्यास बांधकामाला विलंब हाेणार असल्याचे सांगितले. परंतु आयुक्तांनी भूमिका स्पष्ट केल्याने ऑफलाइन प्रस्तावाचा चेंडू महापाैर मसने यांच्याकडे गेला.

...तर बेबनाव वाढणार !

काही दिवसांपासून आयुक्त अराेरा व सत्ताधारी पक्षात बेबनाव सुरू आहे. यामध्ये विराेधी पक्ष काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचीही भर पडली असून प्रशासनाच्या कारभाराप्रती नाराजीचा सूर वाढत चालल्याचे दिसत आहे. शासनाच्या निर्देशानुसार नगररचना विभागाने ऑफलाइनद्वारे प्रस्ताव मंजूर करणे भाग हाेते. महापाैरांनी दिलेल्या पत्रावर आयुक्तांनी ताेडगा न काढल्यास आगामी दिवसांत सर्वपक्षीय विरुद्ध प्रशासन असा सामना रंगण्याची चिन्हं आहेत.

Web Title: Offline Map Approval to Mahapaira's Hall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.