अधिकारी ‘सील’ न उघडता खाली हात परतले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 14:06 IST2019-12-18T14:06:32+5:302019-12-18T14:06:53+5:30
खरेदी बंद किंवा गोदाम सील करण्याचा आदेश कुणीही दिला नसताना गोदामाला सील लागले. परिणामी, त्यावेळेसपासून खरेदी बंद पडली.

अधिकारी ‘सील’ न उघडता खाली हात परतले!
लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा : तालुका खरेदी-विक्री संघटनेमध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाची खरेदी सुरू असताना यामध्ये गैरप्रकार आढळून आल्याने खरेदीच्या गोदामाला ‘सील’ लागले. हे ‘सील’ अनेक दिवसांपासून कायम असल्याने शेतकऱ्यांच्या शेतमालाची खरेदी रखडली असून, ज्या शेतकºयांनी नोंदणी केली, त्यांचा माल खरेदी होत नसल्याने याला दोषी कोण, असा प्रश्न शेतकरी वर्गात उपस्थित होत आहे.
शासनाची नाफेड अंतर्गत खरेदी सुरू झाली. नाफेडची खरेदी एजन्सी म्हणून तालुका खरेदी-विक्री संख्या आहे. ज्या शेतकºयांना आपला माल विकायचा आहे, त्यांनी खरेदी-विक्री संस्थेमध्ये आॅनलाइन नोंदणी केली असून, नंबरप्रमाणे खरेदी सुरू झाली होती. मूग खरेदी सुरू असताना यामध्ये गैरप्रकार होत असल्याची भनक याच संस्थेचे संचालक पुंडलिक अरबट यांना लागली असता त्यांनी गोदाम गाठले व तिथे संबंधित अधिकाºयांना याबाबत माहिती दिली. नायब तहसीलदार व सहायक निबंधक यांनीा पंचनामा केला; परंतु खरेदी बंद किंवा गोदाम सील करण्याचा आदेश कुणीही दिला नसताना गोदामाला सील लागले. परिणामी, त्यावेळेसपासून खरेदी बंद पडली. खरेदी बंद पडल्यामुळे नोंदणीकृत शेतकºयांचा माल खरेदी होत नसल्याने माल कुठे विकायचा, यात आमचा दोष काय, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत असल्याने तालुका खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकºयांमधून होत आहे.
गोदामाला ‘सील’ लावले कुणी?
गोदामाला सील कुणी ठोकले, यावर माहिती घेतली असता खरेदी-विक्रीचे संचालक पुंडलिक अरबट यांनी लावले असल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी व खरेदी-विक्रीचे अध्यक्ष यांनी सांगितले; पण हे करण्याचे अधिकार कुणाला व कोणत्या अधिकारात लावल्या गेले, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे.
तेल्हारा नाफेडमार्फत मूग खरेदीबाबत प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने सहायक निबंधक व नायब तहसीलदार तेल्हारा यांनी पंचनामा केला आहे. त्यापुढील कार्यवाही करण्याबाबत जिल्हा पणन अधिकारी यांना वेळीच कळविण्यात आले आहे. पुढील कार्यवाही मार्केटिंग फेडरेशनचे जिल्हा पणन अधिकारी पवार यांच्यामार्फत सुरू आहे.
- डॉ. प्रवीण लोखंडे,
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, अकोला.