विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2017 16:07 IST2017-04-04T16:07:57+5:302017-04-04T16:07:57+5:30

बार्शीटाकळी तालुक्यातील घटना.

Offense to motivation to commit suicide | विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा

विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा

बार्शीटाकळी(अकोला) : तालुक्यातील दगडपारवा येथील २५ वर्षीय विवाहीतेच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या तिघांविरुद्ध बार्शीटाकळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी १०० ते १५० लोकांचा जमाव बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.
दगडपारवा येथील स्वाती दत्तात्रय महल्ले यांनी २ एप्रिल रोजी जाळून घेतले होते. त्यांना तातडीने अकोला येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारदरम्यान त्यांचा ३ एप्रिल रोजी मृत्यू झाला.या प्रकरणी सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी १०० ते १५० लोकांचा जमाव बार्शीटाकळी पोलीस स्टेशनमध्ये आल्याने तणाव निर्माण झाला होता.

Web Title: Offense to motivation to commit suicide